banner 728x90

नगरसेवकांची माहिती दर्शवणारे फलक लावण्याची मागणी ; सामाजिक कार्यकर्ते श्याम बनपट्टे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना साकडे

banner 468x60

Share This:

पालघर-योगेश चांदेकर


नागरिकांच्या माहितीसाठी उपयुक्त उपक्रम

banner 325x300

पालघरः पालघऱ तसेच जिल्ह्यातील अन्य नगरपरिषदा, नगरपंचायत मध्ये निवडून आलेल्या नगरसेवक, नगराध्यक्षांची माहिती दर्शवणारे फलक संबंधित प्रभागात लावण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते श्याम बनपट्टे यांनी केली आहे. पालघरचे जिल्हाधिकारी तसेच तहसीलदार आणि नगराध्यक्षांना याबाबत बनपट्टे यांनी निवेदन दिले आहे.

सध्या निवडून आलेल्या नगरसेवकांबाबत सामान्य नागरिकांना फारशी माहिती नसल्यामुळे त्यांना कोणाशी आणि कोठे संपर्क साधावा हे समजत नाही. त्यामुळे अनेक विकास कामांसंबंधीच्या तक्रारी व सूचनांची दखल घेतली जात नाही तसेच कोणाकडे दाद मागावी हे समजत नाही.

प्रशासनात पारदर्शकतेसाठी लावा फलक
या पार्श्वभूमीवर बनपट्टे यांनी जिल्हाधिकारी, तहसीलदार आणि नगराध्यक्षांना दिलेल्या निवेदनात फलक लावण्याची महत्त्वपूर्ण मागणी केली आहे. त्यात नागरिकांच्या माहितीसाठी तसेच प्रशासनातील पारदर्शकता वाढवण्यासाठी नगरपालिकेच्या प्रत्येक प्रभागातील निवडून आलेल्या नगरसेवकाची माहिती देणारे फलक लावावेत. या फलकावर प्रभाग क्रमांक, वार्ड क्रमांक, निवडून आलेल्या नगरसेवकाचे नाव, राजकीय पक्षाचे नाव, संपर्क क्रमांक कार्यालयाचा पत्ता आणि कार्यकाळ अशा स्वरूपाची माहिती असावी अशी सूचना बनपट्टे यांनी केली आहे. असे फलक लावल्यामुळे नागरिकांना त्यांच्या लोकप्रतिनिधीशी थेट संपर्क साधणे सोपे होईल तसेच लोकशाही व्यवस्थेमध्ये नागरिकांचा सहभाग वाढण्यास मदत होईल असेही त्यांनी म्हटले आहे.


‘सध्या पालघरसह जिल्ह्यातील नगरपरिषद व नगरपंचायतमध्ये निवडून आलेल्या नगरसेवकांची माहिती नागरिकांना नसते. आपल्या प्रभागातील प्रश्न कोठे मांडावेत याची माहिती नसल्यामुळे अनेक प्रश्न तसेच प्रलंबित राहतात. त्यामुळे नागरिकांचा लोकशाही व्यवस्थेतील सहभाग मर्यादित होतो आणि विकासकामांना अनेकदा कोलदांडा बसतो. अनेकदा नागरिकांना सूचना करावयाच्या असतात; परंतु त्या कोठे कराव्यात, हे समजत नाही. यासाठी नगरपालिकेने संबंधित प्रभाग आणि वार्डातील नगरसेवकांची विस्तृत माहिती लावल्यास नागरिकांची गैरसोय दूर होईल आणि लोकशाही व्यवस्थेत सामान्य नागरिकांचा सहभाग वाढेल.
श्याम बनपट्टे, सामाजिक कार्यकर्ते, पालघर

banner 468x60

banner 468x60

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!