कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहेत. जंतर मंतरवर अभिजीत दिपकेंनी मोठे आंदोलन केले. थेट केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागला.
विद्यार्थी मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले. त्यानंतर अभिजीत दिपकेची देशभरात चर्चा होत होती. अमेरिकेतून भारतात दाखल होत अभिजीत दिपकेंने मोठे आंदोलन पुकारले. पहिल्या प्रयत्नात अभिजीत दिपके यांना अपयश मिळाले. पण दुसरे आंदोलन देशभरात पोहोचले. अभिजीत दिपके यांच्या कुटुंबाच्या आर्थिक स्थितीची चौकशी करण्याची मागणी एका माहिती अधिकार (RTI) कार्यकर्त्यांने केल्यानंतर एकच चर्चा सुरू झाली. अभिजीत दिपकेंच्या वडिलांकडे अभिजीतला अमेरिकेत पाठवण्यासाठी पैसा कुठून आला याची चाैकशी करणारे पत्र देण्यात आले.
अमेरिकेतील बोस्टन युनिव्हर्सिटीमधून अभिजीत दिपकेंनी शिक्षण घेतले. नुकताच अभिजीत दिपके यांनी परदेशातील उच्च शिक्षणाचा खर्च कुटुंबाच्या कोणत्याही अघोषित मालमत्तेतून करण्यात आल्याचा आरोप फेटाळला आहे. अभिजीत दिपके यांनी स्पष्ट केले की, त्यांनी त्यांच्या विदेशातील शिक्षणाचा खर्च नक्की कसा केला आणि कोणी केला. अभिजीत दिपके यांनी म्हटले की, माझ्या शिक्षणाचा खर्च बोस्टन युनिव्हर्सिटीच्या शिष्यवृत्तीतून भागवला गेला.
यासोबतच मी शैक्षणिक कर्जही घेतले होते, ज्याची परतफेड मला आता करावी लागणार आहे. 60,000 ते 65,000 रुपये मासिक उत्पन्न असलेल्या एका सरकारी कर्मचाऱ्याने आपल्या मुलाला उच्च शिक्षणासाठी अमेरिकेला कसे पाठवले असा प्रश्न माहिती अधिकार कार्यकर्ते अमित तिवारी यांनी उपस्थित केला. तसे एक पत्रही त्यांनी अभिजीत दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीची चाैकशी व्हावी, असे दिले.
या आधारावर त्यांनी त्या कुटुंबाच्या आर्थिक स्थितीची चौकशी करण्याची मागणी केली. आता या आरोपींवरही अभिजीत दिपके स्पष्ट बोलले आहेत. अभिजीत दिपके यांच्यावर सतत गंभीर आरोप केली जात आहेत. यासोबतच कॉकरोच जनता पार्टीला आंदोलनासाठी विदेशातून मोठा पैसा पुरवला गेल्याचेही सांगितले जातंय. तसा आरोप होत आहे. मात्र, नक्की कॉकरोच जनता पार्टीला पैसा कोणी पुरवला याबाबत माहिती मिळू शकली नाही.


















zzlWzi8qqy8Un4Ec/s320/1001506655.jpg