राज्यात राबविण्यात आलेल्या मतदारयाद्यांच्या विशेष सखोल फेरतपासणी (एसआयआर) मोहिमेचा घरोघरी जाऊन मतदारांकडून गणना प्रपत्र भरुन घेण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण व पुनर्रचना तसेच मतदारांचे येणारे आक्षेप दूर करण्यासाठी या प्रक्रियाला पुन्हा एकदा मुदतवाढ देण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे.
राज्यात मतदार यांद्याच्या विशेष सखोल फेरतपासणी (एसआयआर) मोहिमेतून तब्बल २ कोटी ०७ लाख मतदार अपात्र ठरण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
राज्यातील एकूण ९ कोटी ७८ लाख ५४ हजार मतदारांपैकी ७ कोटी ७१ लाख ५० हजार(७८.८५टक्के) मतदारांकडून स्वाक्षरीसह प्राप्त झालेल्या गणना प्रपत्रांचे डिजिटायझेशन पूर्ण झाले असून सुमारे २ कोटी ७० लाख (२१.१५) टक्के मतदारांनी गणना प्रपत्र जमा केलेली नाहीत. प्रपत्र जमा झालेले नाही त्यामध्ये ७५ लाख ५२ हजार (७.७२ टक्के) मतदार त्यांच्या मतदार यादीतील पत्यावर आढळून आलेले नाहीत. ७६ लाख ८० हजार(७.८५ टक्के) मतदारांनी कायमस्वरुपी स्थलांतर केल्याचे आढळून आले असून ३४ लाख ८१ हजार(३.५६ टक्के) मृत मतदारांची नावे मतदार यादीत आढळून आली. अन्यत्र नोंदणी किंवा दुबार मतदारांची संख्या १७ लाख ६३ हजार आहे.
विशेषत: मुंबई, ठाणे, नागपूर, पालघर, रायगड या जिल्हयांत गणना प्रपत्र जमा न करणाऱ्या मतदारांची संख्या अधिक आहे. गणना प्रपत्र जमा न केल्याने ही नावे मतदार यादीतून वगळली जाणार आहेत. या मोहिमेची सोमवारी (२४ ऑगस्ट) प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध होणार होती. मात्र मतदार यादीत समावेश न झालेल्या मतदारांचे मोठ्या प्रमाणात येणारे आक्षेप तसेच मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण व पुनर्रचना करणाऱ्यासाठी अधिकचा वेळ लागणार असल्याने पुढील प्रक्रियेसाठी आणखी एक आठवड्याची मुदतवाढ देण्याची मागणी राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे केली होती. यानुसार निवडणूक आयोगाने राज्यातील एसआयआर प्रक्रियेला एक आठवड्यांची मुदतवाढ दिली आहे.
सुधारित कार्यक्रमानुसार, मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण व पुनर्रचना १७ ऑगस्टपर्यंतची मुदत वाढवून आता २४ ऑगस्ट अशी करण्यात आली आहे.
त्यानंतर ३१ ऑगस्ट रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केली जाईल. तर ३१ ऑगस्ट ते ३० सप्टेंबर या कालावधीत मतदारांकडून दावे व हरकती स्वीकारण्यात येतील. तसेच ३१ ऑगस्ट ते २९ ऑक्टोबर या कालावधीत नोटिसा देणे, सुनावणी घेणे आणि दावे-हरकतींचा निपटारा करण्याची प्रक्रिया पार पडेल. तर पूर्वी २७ ऑक्टोबर रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार होती. मात्र आता सुधारित वेळापत्रकानुसार अंतिम मतदार यादी ४ नोव्हेंबरला प्रसिद्ध होईल.
कोटराज्यात कमीत कमी ३०० आणि जास्तीत जास्त १३०० मतदारांसाठी एक मतदान केंद्र असे निकष निश्चित करण्यात आले आहेत. त्यानुसार आता मतदान केंद्राचे सुसूत्रीकरण व पुनर्रचना करण्यात येणार आहे. एखाद्या मतदान केंद्रावर १३०० पेक्षा अधिक मतदार असल्यास त्याचे अन्य मतदान केंद्रात समायोजन करण्यात येणार आहे. अशाच प्रकारे एखाद्या मतदान केंद्रात ३०० पेक्षा कमी मतदार असल्यास त्यांचेही अन्य मतदान केंद्रात समायोजन करण्यासाठी विलंब लागणार असल्याने आयोगाने मुदतवाढ दिली आहे.– एस. चोकलिंगम, राज्य मुख्य निवडणूक अधिकारी


















zzlWzi8qqy8Un4Ec/s320/1001506655.jpg