banner 728x90

तुपारी गांवा मध्ये भारताचा ८० व्या स्वातंत्र्य दिन मोठ्या दिमाखात साजरा” तुपारीत विविध क्षेत्रातील गुणवंतांचा गुणगौरव सोहळा उत्साहात

banner 468x60

Share This:

सांगली: भारताच्या ८० व्या स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून ग्रामपंचायत तुपारीच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा गुणगौरव व सत्कार सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. हा कार्यक्रम सौ. सुरेखा झनक राक्षे (काकी), आपला सरपंच, ग्रामपंचायत तुपारी यांच्यामार्फत आयोजित करण्यात आला.

यावेळी समाज गौरव पुरस्कार श्री. गणपती बंडू पाटील (नाना), श्री. रोहन प्रकाश पाटील व श्री. जयेश गजानन मरळे यांना प्रदान करण्यात आला. नवउद्योजक पुरस्कार श्री. बाबासो भुपाल आडके, तर प्रगतशील शेतकरी पुरस्कार श्री. संग्राम दीपक पाटील यांना देण्यात आला. सांस्कृतिक वारसा पुरस्कार नामदेव भजनी मंडळ, तुपारी यांना प्रदान करण्यात आला.

banner 325x300

तसेच तुपारीच्या शिरपेचात मनाचा तुरा म्हणून ज्यांची निवड झाले असे श्री. सुकुमार रामचंद्र पाटील (काका) यांची क्रांतिअग्रणी जी. डी. (बापू) लाड सहकारी साखर कारखान्याच्या संचालक पदी निवड, सौ. मंगल बजरंग माने (मा. सरपंच) यांची कृष्णा वेगळा सहकारी सूतगिरणी पलूस च्या संचालिका पदी आणि सौ. ज्योती बाबासो आडके यांची विशेष कार्यकारी पदी निवड, श्री. उदय दयानंद काळे (भारतीय रिझर्व्ह बँक मॅनेजर), कुमारी. सुजाता आनंदा क्षीरसागर (मोडी लिपी तज्ञ) यांचे ग्रामपंचायत तुपारी मार्फत त्यांचे जाहीर सत्कार करण्यात आले.

याशिवाय विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थी कुमारी. प्राची धनाजी घाडगे (कुस्ती), कुमारी. श्रावणी अभिजीत पाटील (नेटबॉल), कुमारी. नंदिनी सचिन खुडे (बेसबॉल), कुमार. साई संदीप तेवरे (बेसबॉल) आणि यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

गुणवंत विद्यार्थी म्हणून कुमारी साक्षी किरण माने, कुमारी अक्षरा प्रदीप पाटील, कुमारी हर्षदा बाळासो काळे आणि कुमारी हृतिका विठ्ठल पाटील यांचा गौरव करण्यात आला.

स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने ग्रामपंचायतीच्या वतीने वक्तृत्व स्पर्धा पार पडल्या त्यामध्ये प्रथम क्रमांक कुमारी. समया पाटसुपे, द्वितीय क्रमांक कुमारी. संयुक्ता पाटील, तृतीय क्रमांक कुमारी. राजनंदिनी मोटे, उत्तेजनार्थ कुमारी. अनन्या पाटील आणि कुमारी. श्रुतिका पाटसुपे हे विजेते ठरले यासाठी परीक्षक म्हणून श्री. बजरंग माने (आण्णा), श्री. बी. ए. पाटील (सर), आणि श्री. डी. पी. राक्षे यांनी काम पहिले. तसेच विज्ञान प्रदर्शन मध्ये प्रथम क्रमांक कुमार. देवराज चव्हाण, द्वितीय क्रमांक कुमारी. दुहिता वाकळे, तृतीय क्रमांक प्रिशा घाडगे आणि उत्तेजनार्थ कुमारी. रिया साळुंखे व कुमार आशुतोष घाडगे हे विजेते ठरले यासाठी परीक्षक म्हणून ग्रामसेविका श्रीमती. एस. एस. ढवणे मॅडम, सौ. शेहल दीपक पाटील मॅडम आणि सौ. प्रियंका गोपाळ पाटसूपे मॅडम यांनी काम पहिले तसेच रक्तदान शिबिरासाठी भारती हॉस्पिटल सांगली यांचे योगदान लाभले. विद्यार्थ्यांनी विज्ञान प्रदर्शनातून विविध प्रयोग व कल्पक प्रकल्प सादर केले, तर वक्तृत्व स्पर्धेत विद्यार्थ्यांनी देशभक्ती, स्वातंत्र्यलढा आणि राष्ट्रनिर्माण या विषयांवर प्रभावी विचार मांडले. रक्तदान शिबिरासही ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

कार्यक्रमामुळे तुपारी गावातील विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या गुणवंत व्यक्तींच्या कार्याची दखल घेऊन त्यांना प्रोत्साहन मिळाले. “गावातील गुणवंतांचा सन्मान आणि नव्या पिढीला प्रेरणा” या उद्देशाने आयोजित करण्यात आलेला हा सोहळा ग्रामस्थांसाठी प्रेरणादायी ठरला. या कार्यक्रमात पुरस्कार प्राप्त व्यक्ति ना “भारताचे संविधान” प्रती देण्यात आल्या सदर कार्यक्रमाचे नियोजन सामाजिक कार्यकर्ते श्री. संदिप राक्षे (आप्पा) यांनी केले होते. या कार्यक्रमास तुपारी गावातील सर्व मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

banner 468x60

banner 468x60

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!