– कोकण आणि पूर्व विदर्भात काही ठिकाणी पावसाची शक्यता; अनेक जिल्ह्यांत विजांसह हलक्या सरींचा अंदाज.
– गडचिरोलीच्या भामरागडमध्ये पूरस्थिती गंभीर; 50 पेक्षा जास्त गावांचा संपर्क तुटला.
– मुंबईत उकाडा वाढला; कुलाब्यात 33.2°C कमाल तापमानाची नोंद.
गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेला पावसाने मात्र आता पाठ फिरवली. मात्र काही ठिकाणी अजूनही ढग आले आणि विजांसह पावसाची शक्यता हवामान खात्याने सांगितली आहे.
मान्सून परत चालला
दिल्ली, राजस्थान, पंजाब, हरियाणा या राज्यांतून मान्सूनने माघार घेतली. गुजरात आणि उत्तर प्रदेशच्या काही भागातून पण पावसाने माघार घेतली. ईशान्य मध्य प्रदेश आणि उत्तर छत्तीसगडमध्ये अजूनही एक तीव्र कमी दाबाचं निर्माण धाले आणि पावसाने पाठ फिरवली.
महाराष्ट्रात काय स्थिती?
राज्यात बऱ्याच ठिकाणी लोक अजूनही पावसाची वाट बघतात काही ठिकाणी पावसाच्या हलकी सर येतात आणि ऊन वाढते. हवामान खात्याने सांगितलं आहे की, पूर्व विदर्भ आणि कोकणात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, नाशिक घाट, पुणे घाट, सातारा घाट, कोल्हापूर घाट, सांगली, सातारा, पुणे, सोलापूर, अहिल्यानगर, बीड, धाराशिव, लातूर या जिल्ह्यांमध्ये विजांसह हलक्या सरी पडतील. बाकीच्या राज्यात फक्त ढगाळ वातावरण राहील आणि ऊन जास्त असेल.
गडचिरोलीत पुराची स्थिती गंभीरएकीकडे पाऊस ओसरला म्हणत असताना दुसरीकडे छत्तीसगडमधल्या मुसळधार पावसाचा फटका आपल्या विदर्भाला बसला आहे.छत्तीसगड आणि गडचिरोलीत दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू असल्याने भामरागड तालुक्यात पूर परिस्थिती निर्माण झाली. इंद्रावती, पर्लकोटा आणि पामुलगौतम या तीनही नद्यांचं पाणी खूप वाढलं आहे. त्यामुळे भामरागडमध्ये पूरस्थिती खूपच गंभीर झाली आहे. या पुरामुळे भामरागड तालुक्यातील 50 पेक्षा जास्त गावांचा संपर्क तुटला आहे. गावांचा बाहेरच्या जगाशी संबंधच राहिला नाही. लोक अडकून पडले आहेत.
मुंबईत उकाड्याने हैराण
मुंबईकरांचे सुद्धा हाल होत आहेत. गेल्या काही दिवसांपासून मुंबईत उकाडा खूप वाढला. तापमान 1 ते 2 डिग्रीने वाढल्याने शनिवारी पण मुंबईत खूप उकाडा होता. कुलाबा केंद्रात 33.2 डिग्री कमाल तापमान नोंदवलं गेलं. किमान तापमान पण जास्त होतं.सप्टेंबरमध्ये एवढं तापमान गेल्या पाच वर्षात नव्हतं. याआधी 7 सप्टेंबर 2020 ला कुलाब्यात 33.5 डिग्री तापमान होतं.
पाऊस गेला की उकाडा आलाच
एकंदरीत सांगायचं तर राज्यातून पावसाने काढता पाय घेतला आहे, पण कोकण आणि घाटमाथ्यावर अजूनही हलक्या सरी सुरू राहतील. आणि जिथे पाऊस नाही तिथे उन्हाचा चटका आणि उकाडा वाढणार आहे, त्यामुळे पुढचे काही दिवस असेच जाणार आहेत


















zzlWzi8qqy8Un4Ec/s320/1001506655.jpg