banner 728x90

महाराष्ट्रातील SIR मोहिमेबाबत मोठा निर्णय, आता बीएलओ थेट मतदारांच्या घरी धडकणार, कारण तरी काय

banner 468x60

Share This:

महाराष्ट्रातील मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) प्रक्रियेत निवडणूक आयोगाने महत्त्वाचे बदल केले आहेत. दावे आणि हरकती दाखल करण्यासाठी महाराष्ट्राला मुदतवाढ देण्यात आली आहे.

जुळणी न झालेले मतदार किंवा Logical Discrepancies मुळे नोटीस मिळालेल्या मतदारांच्या घरी BLO भेट देणार आहेत. SIR प्रक्रियेवरून देशभरात वादंग उठले आहे. निवडणूक आयोगातच या प्रक्रियेवरून मतभेद असल्याचा दावा करण्यात येत होता. काल मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार, आयुक्त सुखबिर सिंग संधू आणि विवेक जोशी यांच्यात बैठक झाली. त्यात काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. त्यानुसार हा मोठा बदल झाला आहे.

बीएलओ मतदारांच्या घरी जाऊन कागदपत्रे जमा करणार

BLO संबंधित मतदारांकडून आवश्यक कागदपत्रे घरीच जमा करून घेतील. जमा झालेली कागदपत्रे ECINet प्रणालीवर अपलोड केली जाणार आहेत. त्यानंतर संबंधित ERO कागदपत्रांची तपासणी करून निर्णय घेणार आहेत. त्यामुळे अशा मतदारांना कागदपत्रे सादर करण्यासाठी ERO किंवा AERO कार्यालयात जाण्याची गरज सामान्यत: राहणार नाही. अपवादात्मक परिस्थितीत आवश्यक असल्यास ऑनलाइन सुनावणी घेण्यात येणार आहे. या सुनावणीसाठी मतदाराच्या वतीने कुटुंबातील प्रौढ सदस्य उपस्थित राहू शकतो

banner 325x300

बेघर, मजूर, गरीब आणि रात्र निवाऱ्यांमध्ये राहणाऱ्या नागरिकांसाठी विशेष Help Desks आणि शिबिरे आयोजित केली जाणार आहेत. मतदार यादीत नाव नसलेल्या पात्र नागरिकांनाही नियमानुसार नाव समाविष्ट करण्यासाठी अर्ज करता येणार आहे. या बदलामुळे मतदारांना मोठा दिलासा मिळाला आहे.

SIR प्रक्रियेला मुदतवाढ

महाराष्ट्रात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनर्निरीक्षण प्रक्रियेला केंद्रीय निवडणूक आयोगाने मुदतवाढ दिली आहे. आयोगाने शनिवारी झालेल्या बैठकीत हा फैसला घेतला. शनिवारी झालेल्या बैठकीत दावे आणि हरकती दाखल करण्याची मुदत 16 नोव्हेंबर 2026 रोजीपर्यंत वाढवली आहे. प्राप्त नोटिसा, दावे आणि हरकती निकाली काढण्यासाठी 10 नोव्हेंबर 2026 रोजीपर्यंत बीएलओ घरी जाऊन कागदपत्रे जमा करतील.

बेघर, मजूर आणि गरजूंसाठी विशेष मदत कक्ष

राज्यातील बेघर, मजूर आणि गरीब, रात्र निवाऱ्यांमधील नागरिकांना मतदार नोंदणी आणि मतदार यादीतील दुरुस्ती प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी महत्त्वाचे पाऊल टाकण्यात आले आहे. जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांना गरजेनुसार विशेष मदत कक्ष आणि विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. एसआयआर प्रक्रियेत ज्यांची नावे वगळण्यात आली आहेत, अथवा जे नवीन मतदार आहेत, ते आपले नाव यादीत समाविष्ट करण्यासाठी अर्ज करू शकतात. ज्यांना नोंटिसा मिळाल्या आहेत, त्यांची कागदपत्रे जमा करण्यासाठी बीएलओ मतदारांच्या घरी जाऊन कागदपत्रे जमा करतील.

banner 468x60

banner 468x60

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!