banner 728x90

महागाईचे धक्के सुरुच, देशभरात 7,108 पेट्रोल पंपांचं नेटवर्क असलेल्या कंपनीकडून पेट्रोलच्या दरात 5 तर डिझेलच्या दरात 3 रुपयांची वाढ

banner 468x60

Share This:

भारतातील खासगी क्षेत्रातील सर्वात मोठी पेट्रोलियम रिटेलर कंपनी नायरा एनर्जीनं पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढीचा निर्णय घेतला आहे. ही दरवाढ तात्काळ लागू होणार आहे.

आंतरराष्ट्रीय तेल बाजारात क्रूड ऑईलचे दर वाढल्यानं निर्माण झालेल्या दबावामुळं नायरा एनर्जीनं पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ केली आहे.

banner 325x300

नायरा एनर्जीनंकडून देशभरात 7108 पेट्रोल पंप चालवले जातात. नायरा कंपनीं शनिवारी पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढवले आहेत.

अमेरिका इराण यांच्यातील संघर्षामुळं काही महिन्यांपूर्वी होर्मुझमधून होणारा तेलपुरवठा प्रभावित झाल्यानं त्यावेळी देखील पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाली होती. नायरा एनर्जीनं देखील त्यावेळी पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढवले होते. 26 मार्चला पेट्रोलचे दर 5 रुपयांनी तर डिझेलचा दर 3 रुपये लिटरनं वाढवला होता.

सार्वजनिक क्षेत्रातील ऑईल मार्केटिंग कंपन्यांनी मे महिन्यात पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढवण्यास सुरुवात केली होती. त्यानंतर नायरा कंपनीनं मार्च महिन्यातील दरवाढ मागे घेतली होती. आखाती देशांमधील तणाव कमी झाल्यानंतर आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाच्या दरात घसरण झाली होती. त्यामुळं कंपनीनं 1 जुलै रोजी पेट्रोलचे दर 5 रुपयांनी तर डिझेलचे दर 3 रुपये लिटरनं कमी केले होते. नायरा कंपनीच्या पेट्रोलचा दर भोपाळमध्ये 120 रुपये लिटर तर डिझेलचा दर 103 रुपयांवर पोहोचल्याची माहिती आहे.

दरम्यान, भारतात सरकारच्या तेल मार्केटिंग कंपन्यांचं या क्षेत्रात वर्चस्व आहे. इंडियन ऑईल कॉर्पोरेशन, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन आणि हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन यांचे 104137 पेट्रोल पंप आहेत. तर, जिओ-बीपी कंपनीद्वारे 2304 पेट्रोल पंप देशभरात आहेत. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड आणि यूकेस्थित बीपी कंपनीची संयुक्त भागिदारी असलेल्या कंपनीकडून दरवाढ करण्यात आलेली नाही.

banner 468x60

banner 468x60

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!