पालघर-योगेश चांदेकर
परराष्ट्र मंत्रालयातर्फे जाणाऱ्या २० खासदारांच्या शिष्टमंडळात समावेश
पालघर–-भारत सरकारतर्फे १९ ते २३ ऑक्टोबर २०२६ दरम्यान न्यूयॉर्क येथे होणाऱ्या संयुक्त राष्ट्र महासभेच्या ८१ व्या सत्रासाठी (81st Session of the United Nations General Assembly – UNGA) पाठवण्यात येणाऱ्या २० खासदारांच्या उच्चस्तरीय शिष्टमंडळात पालघर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. हेमंत विष्णू सवरा यांची विशेष निवड करण्यात आली आहे.
आंतरराष्ट्रीय मंचावर भारताचे प्रतिनिधित्व करण्याची ही अत्यंत महत्त्वपूर्ण जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली आहे.
या शिष्टमंडळात देशभरातील निवडक आणि अभ्यासू खासदारांचा समावेश करण्यात आला असून, त्यात डॉ. हेमंत सवरा यांना स्थान मिळणे ही पालघर जिल्ह्यासाठी आणि संपूर्ण महाराष्ट्रासाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे. या दौऱ्यात ते संयुक्त राष्ट्रसंघात होणाऱ्या विविध जागतिक विषयांवरील चर्चा, धोरणात्मक बैठका आणि परिसंवादांमध्ये भारताची भूमिका समर्थपणे मांडण्याची संधी मिळणार आहे.
डॉ. हेमंत सवरा यांच्या सामाजिक, राजकीय आणि वैद्यकीय क्षेत्रातील दांडग्या अनुभवाचा या आंतरराष्ट्रीय प्रतिनिधी मंडळात भारताला नक्कीच फायदा होईल.
पालघरसारख्या आदिवासीबहुल आणि ग्रामीण भागातील जनतेचे प्रश्न हिरिरीने मांडणाऱ्या एका लोकप्रतिनिधीला थेट जागतिक पातळीवर देशाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाल्याने संपूर्ण पालघर लोकसभा मतदारसंघात उत्साहाचे वातावरण आहे.
या महत्त्वपूर्ण निवडीबद्दल खासदार डॉ. हेमंत सवरा यांनी देशाचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी,परराष्ट्र मंत्री जयशंकर जी आणि भारत सरकारचे मनःपूर्वक आभार मानले आहेत.
“जागतिक मंचावर आपल्या महान देशाचे आणि माझ्या पालघरच्या जनतेचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणे हा मी माझा मोठा सन्मान मानतो. ही जबाबदारी मी पूर्ण क्षमतेने आणि निष्ठेने पार पाडेन,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.


















zzlWzi8qqy8Un4Ec/s320/1001506655.jpg