मुंबई : देशात कोरोनाचा शिरकाव झाला आणि, सगळं काही ठप्प झालं. कोरोनाने सगळीकडे थैमान घातलं आहे. गेल्या काही दिवसांमध्ये राज्यातील परिस्थिती खूपच गंभीर होती. परंतू, आता कोरोनाची परिस्थिती हळूहळू सुधारत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर सरकारने पुन्हा काही गोष्टी पुर्ववत सुरू करायचा निर्णय घेतला आहे. राज्यातील कोरोनामुक्त गावांमध्ये टप्प्याटप्प्याने शाळा सुरू करण्यात येणार आहेत.
राज्यात पुन्हा शाळेची घंटा वाजणार; ‘या’ भागात सुरु होणार आठवी ते बारावीचे वर्ग
कोरोनामुक्त झालेल्या विभागात पहिल्या टप्प्यात इयत्ता पहिली ते बारावीचे वर्ग सुरळीतपणे सुरु करण्याबाबतचा शासन निर्णय घेण्यात आला आहे. शिक्षण विभागाने हा निर्णय जाहीर केला आहे. राज्यातील कोरोनामुक्त क्षेत्राच्या शाळांनी ठराव करून कोविड निकषांच्या आधारे पहिल्या टप्प्यात शाळा सुरू करण्यात येणार आहे. ज्या गावात आठवी ते बारावी वर्ग सुरु करायचे आहेत त्या गावात किमान महिनाभर आधीपासून एकही कोविड रुग्ण नसावा, अशा सुचना समितीला देण्यात आल्या आहेत.
टप्प्याटप्पाने, वेगवेगळ्या वेळी विद्यार्थ्यांना शाळेत बोलवण्यात येणार आहे. शाळेत शिकवताना महत्त्वाच्या विषयांना प्राधान्य देण्यात येणार आहे. दोन बाकांमध्ये 6 फुटांचं अंतर ठेऊन, एका बाकावर एकच विद्यार्थी असणार आहे. तर एका वर्गात किमाल 20 विद्यार्थी मर्यादा असणार आहे. पालक शिक्षक बैठका फक्त ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे. येत्या 15 जुलैपासून शाळा सुरू करण्यात येणार आहेत.
Recommendation for You

Post Views : 112 पालघर-योगेश चांदेकर पालघर– शिक्षणाची गंगा केवळ शहरांच्या भिंतींपुरती मर्यादित न राहता…

Post Views : 112 पालघर-योगेश चांदेकर पालघर– वसई तालुक्यातील नामांकित सेवा विवेक संस्थेने आदिवासी महिला…

Post Views : 112 पालघर-योगेश चांदेकर पालघर: ‘रॉयल-सिट्रस कंपनी’तील गुंतवणूकदार सभासद आणि प्रतिनिधींना परतावा मिळवून…

शिरगाव मांगेलआळी परिवाराचा समाजोपयोगी उपक्रम; गणेश विसर्जनासाठी विनामूल्य होडीसेवा व मनुष्यबळ उपलब्ध
Post Views : 112 पालघर : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक बांधिलकी जपत शिरगाव मांगेलआळी परिवारातर्फे गणेशमूर्ती…

Post Views : 112 पालघर-योगेश चांदेकर आसनगावच्या सूर्यवंशी क्षत्रिय कुणबी समाज गणेशोत्सव मंडळाचा देखावा पालघर:…












zzlWzi8qqy8Un4Ec/s320/1001506655.jpg