मुंबई: आजपासून विधिमंडळाचे 2 दिवसीय पावसाळी अधिवेशन सुरू झाले असून, पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे खासदार संजय राऊत व भाजपचे आमदार आशिष शेलार यांच्यात झालेल्या बैठकीवरून उलटसुलट चर्चा सुरू आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी याबद्दल केलेल्या एका वक्तव्यानंतर आता संजय राऊत यांनी शिवसेना व भाजपमधील संबंधांची अभिनेता आमीर खान व किरण राव यांच्या घटस्फोटाशी तुलना केली आहे.
भाजप-शिवसेना युतीवर बोलताना संजय राऊत यांनी दिला, आमिर खान-किरण रावच्या घटस्फोटाचा दाखला
आज पत्रकारांनी फडणवीस यांना भविष्यात शिवसेना-भाजपची युती पुन्हा होण्याची शक्यता आहे का, असे प्रश्न विचारले होते. त्यावर त्यांनी थेट काही बोलण्याचं टाळलं आहे. राजकारणात ‘जर आणि तर’ला अर्थ नसतो. शिवसेना व भाजपमध्ये काही मतभेद असतील, पण आम्ही एकमेकांचे शत्रू नाही, असे फडणवीस म्हणाले होते.
फडणवीसांच्या या वक्तव्यावर संजय राऊत यांनी आपली प्रतिक्रिया दिली.फडणवीस याचे वक्तव्य योग्य असल्याचं त्यांनी सांगितलं. ‘गेल्या अनेक दिवसांपासून मी हेच बोलतोय. आमचे राजकीय मार्ग बदलले आहेत. पण नेत्यांमध्ये संवाद कायम आहे. शिवसेना-भाजप म्हणजे काही भारत-पाकिस्तान नाही. आमच्यामध्ये भेटीगाठी होत असतात. चर्चा होत असते,’ असं राऊत म्हणाले.
आमिर आणि किरण राव यांनी आपले मार्ग बदलले आहेत. पण त्यांची मैत्री कायम राहणार आहे. तसंच आमचं आहे. राजकारणात संबंध राहतीलच. भाजप व शिवसेनेमधील बदललेल्या संबंधांबाबत बोलताना राऊत यांनी आमिर खान व किरण राव यांच्यातील घटस्फोटाचा दाखला दिला. याचा अर्थ आम्ही एकत्र येऊन सरकार स्थापन करणार असा होत नाही,’ असेही राऊत यांनी स्पष्ट केलं.
Recommendation for You

Post Views : 100 पालघर आगारात प्रवाशांच्या सेवेत पाच नवीन ‘राजमाता जिजाऊ’ बसगाड्यांचा समावेश करण्यात…

पालघर-योगेश चांदेकर पालघर: जव्हार तालुक्यातील धारणहट्टी गावातील दोन आदिवासी अल्पवयीन मुलांना बालकामगार म्हणून वाडा तालुक्यातील…

Post Views : 100 शासनाने जाहीर केलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत…

Post Views : 100 पालघर-योगेश चांदेकर पालघर- आधुनिक पालघरच्या निर्मितीत आणि विकासाच्या प्रक्रियेत राजेंद्र गावित…

पालघर-योगेश चांदेकर पालघर: राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने पालघर जिल्ह्यात मोठी कारवाई करत बनावट…












zzlWzi8qqy8Un4Ec/s320/1001506655.jpg