मुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भाजप आणि शिवसेनेच्या युतीवर मोठे विधान केले आहे. राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. याच दरम्यान फडणवीसांना भाजप आणि शिवसेना पुन्हा एकत्र येण्याची शक्यता आहे का? असा प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाचं उत्तर देताना फडणवीस म्हणाले की, भाजप आणि सत्ताधारी शिवसेनेत काही मुद्द्यांवरुन मतभेद आहेत. परिस्थितीनुसार निर्णय घेतले जातात.
भाजप-शिवसेनेत काही मतभेद असतील, पण आम्ही शत्रू नाहीत; फडणवीसांचे वक्तव्य
शिवसेनेसोबत काही मतभेद असतील पण आम्ही शत्रू नाही, असे फडणवीस म्हणाले. आम्ही (शिवसेना आणि भाजप) कधीच शत्रू नव्हतो. दरम्यान, यावेळी त्यांनी शिवसेनेशी युती होण्याची शक्यता ही नाकारली नाही. राज्यातील प्रश्नांपासून पळ काढण्यासाठी सरकार अधिवेशनाचा काळ कमी करत असून, यंदाचे अधिवेशन दोनच दिवसात गुंडाळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सरकार लोकशाहीला कुलूप लावण्याचा प्रयत्न करत असल्याची टीका करताना सभागृहात बोलू दिलं नाही, तर आम्ही माध्यमांसमोर, रस्त्यावर येऊन आणि जनतेत जाऊन आमचं म्हणणं मांडू अशी प्रतिक्रिया फडणवीस यांनी दिली आहे.
Recommendation for You

Post Views : 112 पालघर-योगेश चांदेकर पालघर– शिक्षणाची गंगा केवळ शहरांच्या भिंतींपुरती मर्यादित न राहता…

Post Views : 112 पालघर-योगेश चांदेकर पालघर– वसई तालुक्यातील नामांकित सेवा विवेक संस्थेने आदिवासी महिला…

Post Views : 112 पालघर-योगेश चांदेकर पालघर: ‘रॉयल-सिट्रस कंपनी’तील गुंतवणूकदार सभासद आणि प्रतिनिधींना परतावा मिळवून…

शिरगाव मांगेलआळी परिवाराचा समाजोपयोगी उपक्रम; गणेश विसर्जनासाठी विनामूल्य होडीसेवा व मनुष्यबळ उपलब्ध
Post Views : 112 पालघर : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक बांधिलकी जपत शिरगाव मांगेलआळी परिवारातर्फे गणेशमूर्ती…

Post Views : 112 पालघर-योगेश चांदेकर आसनगावच्या सूर्यवंशी क्षत्रिय कुणबी समाज गणेशोत्सव मंडळाचा देखावा पालघर:…












zzlWzi8qqy8Un4Ec/s320/1001506655.jpg