banner 728x90

Mansoon Session : आजपासून विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू

banner 468x60

Share This:

मुंबई : महाराष्ट्र राज्याचे विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन आजपासून मुंबईत सकाळी 11 वाजता सुरू होत आहे. यंदाचे अधिवेशन दोनच दिवसात गुंडाळण्याचा प्रयत्न सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारच्या वतीने करण्यात आला आहे. या अधिवेशनात विरोधक वेगवेगळ्या मुद्द्यांवरुन सरकारवर टीका करतील तर दुसरीकडे विरोधकांच्या टीकेवर महाविकासआघाडी सरकारचे नेते वेळ मारून नेण्याचा प्रयत्न करतील. विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घेण्याची शक्यता जवळपास कमी असल्याने लक्षवेधी तारांकित प्रश्न -उत्तरेदेखील नसणार आहेत. यामुळे विरोधक सरकारच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेणार आहे.

अधिवेशन सुरू होण्यापूर्वी आज सकाळी दहाच्या आसपास विधिमंडळ काँग्रेस कार्यालयाची बैठक होणार असून या बैठकीकडे लक्ष लागलं आहे. काँग्रेस आता स्वतःच्या भूमिकेवरून मागे हटणार की विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक लावणार याकडे लक्ष आहे. तूर्तास तरी विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक होण्याची शक्यता जवळपास संपली आहे. कोरोना, राज्यातील शेतकऱ्यांची अवस्था, मराठा आरक्षण, ओबीसी राजकीय आरक्षण अशा वेगवेगळ्या मुद्द्यांवर राज्य सरकारची कोंडी विरोधक करू शकतील. 
या अधिवेशनात विधानसभा सत्रामध्ये सर्वात महत्त्वाचे म्हणजे सन 2021-22 च्या पुरवणी भागाच्या मागण्या सादर केल्या जाणार आहेत. तसेच वेगवेगळ्या विभागांची कागदपत्रं सभागृहाच्या पटलावर सादर केली जातील. तत्कालीन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या कार्यकाळात राज्यात 33 कोटी वृक्ष लागवडीच्या मोहिमेच्या संदर्भात गठीत करण्यात आलेल्या चौकशीच्या समितीला पुढील अधिवेशनाच्या शेवटच्या दिनांकापर्यंत वेळ वाढवून देण्यात यावा, अशा स्वरूपाचा प्रस्तावदेखील आज मांडण्यात येणार आहे. विधानसभेचे सदस्य राहिलेले रावसाहेब अंतापुरकर, राज्यसभेचे विद्यमान सदस्य आणि माजी विधानसभा सदस्य राजू सातव, माजी मंत्री संजय देवतळे, रामप्रसाद बोराडे, माजी खासदार एकनाथ गायकवाड यांच्या दुःखद निधनाबद्दलही सभागृहामध्ये शोकप्रस्ताव असेल.

banner 468x60

banner 468x60

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!