banner 728x90

अखेर ठरलं, ठाकरे की शिंदे? कोणाचा दसरा मेळावा होणार शिवाजी पार्कवर

banner 468x60

Share This:

दादर येथील ऐतिहासिक छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर (शिवाजी पार्क) होणाऱ्या यंदाच्या पारंपरिक दसरा मेळाव्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा मार्ग मोकळा झाला आहे. महापालिकेच्या ‘जी-उत्तर’ विभागाने ठाकरेंच्या सेनेला मेळाव्यासाठी परवानगी दिली आहे.

आता एकनाथ शिंदे यांच्या सेनेचा मेळावा कुठे होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दोन महिन्यांपूर्वीच परवानगी

विशेष म्हणजे, यंदा या मैदानासाठी ठाकरेंच्या सेने व्यतिरिक्त इतर कोणत्याही राजकीय पक्षाचा किंवा संघटनेचा अर्ज आला नसल्याने महापालिकेने तत्काळ ही मंजुरी दिली आहे. शिवसेनेच्या स्थापनेपासून शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्याची प्रदीर्घ परंपरा आहे. यंदाच्या मेळाव्यासाठी ठाकरेंच्या सेनेकडून सुमारे दोन महिन्यांपूर्वीच महापालिकेच्या जी-उत्तर विभागाकडे रीतसर अर्ज दाखल केला होता.

banner 325x300

यापूर्वी दसरा मेळाव्यावरुन ड्रामा

दसरा मेळाव्यासाठी अन्य कोणताही दावा किंवा अर्ज न आल्यामुळे प्रशासकीय नियमांनुसार ठाकरेंच्या सेनेला शिवाजी पार्क मैदान वापरण्याची परवानगी देण्यात आली आहे. शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतर शिवाजी पार्क मैदानावरील दसरा मेळाव्यावरून प्रचंड राजकीय हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला होता. दोन्ही गटांकडून मैदानावर दावा सांगण्यात येत असल्याने वाद न्यायालयापर्यंत गेला होता. तसेच इतर काही संघटनाही अर्ज करत असल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापत असे.

ठाकरेंच्या सेनेला परवानगी

मात्र, यंदा कोणताही राजकीय कलगीतुरा न रंगता शांततेत आणि थेट ठाकरेंच्या सेनेला ही परवानगी मिळाली आहे. या मंजुरीमुळे येत्या २० ऑक्टोबर रोजी होणाऱ्या दसरा मेळाव्यात शिवाजी पार्कवर ठाकरे गटाचा मेळावा होणार आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या सेनेचा मेळावा आता कुठे होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

banner 468x60

banner 468x60

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!