banner 728x90

अखेर सरकारचा तडकाफडकी निर्णय! लाडक्या बहिणींना लॉटरी, ती मागणी मान्य; लाखो महिलांचं टेन्शनच मिटलं!

banner 468x60

Share This:

राज्याच्या राजकारणातील गेम चेंजिंग ठरलेली योजना म्हणजे मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना. गेल्या काही दिवसांपासून या योजनेबाबात संभ्रम निर्माण केला जात आहे. तसेच ई-केवायची प्रक्रिया पूर्ण न झालेल्या महिलांना या योजनेचा लाभ घेता आला नाही.

आता मंत्री आदिती तटकरे यांनी या योजनेबाबत आनंदाची बातमी दिली आहे.

आदिती तटकरे यांनी माध्यमांना सांगितले की, लाडकी बहीण योजनेतील ई केवायसी करण्यासाठी सरकारने सहा महिन्याची मुदत दिलेली आहे. ही सर्व लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे.

पुढे त्या म्हणाल्या, ज्या महिलांनी एक केवायसी पूर्ण केली मात्र त्यात काही उनिवा राहून गेल्यात त्यांना दुरुस्त करण्याची संधी देण्यात आली आहे. लाडकी बहीण योजना यशस्वीरित्या राबविली जाणार आहे.
काही दिवसांपूर्वी लाडकी बहिण योजनेचा हफ्ता वाढवण्याची मागणी काही महिलांनी केली होती. त्यावर बोलताना आदिती तटकरे म्हणाल्या की, लाडकी बहीण योजनेचा हप्ता जास्त वाढवायचा का या संदर्भात मुख्यमंत्री निर्णय घेतील.

दिल्लीतील आंदोलनाबाबत बोलताना आदिती तटकरे म्हणाल्या की, देशात लोकशाही आहे. लोकशाहीमध्ये एखादी गोष्ट चुकत असेल तर ती लक्षात आणून देणे ते लोकशाहीमध्ये अधिकार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुधारणा बिल आणण्याची पाऊले उचललेली आहेत. विद्यार्थ्यांच्या विविध मागण्या हे सरकार सकारात्मक पद्धतीने सोडवेल आपली शिक्षण व्यवस्था अधिकाधिक चांगल्या पद्धतीने सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून पावले उचलते.

banner 468x60

banner 468x60

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!