banner 728x90

पहिली ते बारावीच्या शिक्षकांसाठी ‘एआय साथी’ कोर्स अनिवार्य; काय आहे शासनाचा नवा नियम?

banner 468x60

Share This:

राज्यातील पहिली ते बारावीपर्यंतच्या सर्व शिक्षकांसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) प्रशिक्षण अनिवार्य करण्यात आले आहे. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (SCERT) यांनी ‘AI साथी फॉर एज्युकेटर्स’ हा ऑनलाइन प्रशिक्षण कोर्स पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत.

शिक्षण क्षेत्रात AI तंत्रज्ञानाचा प्रभावी, सुरक्षित आणि नैतिक वापर व्हावा, या उद्देशाने हा महत्त्वाकांक्षी उपक्रम राबविण्यात येत आहे.

हा कोर्स ‘दीक्षा’ (DIKSHA) पोर्टलवर उपलब्ध असून शिक्षकांना 31 ऑगस्टपर्यंत नोंदणी करता येणार आहे. नोंदणी केल्यानंतर 30 सप्टेंबर 2026 पर्यंत कोर्स पूर्ण करणे बंधनकारक असणार आहे. SCERT ने सर्व शिक्षणाधिकारी, मुख्याध्यापक आणि प्राचार्यांना मुदतीत सर्व शिक्षकांकडून कोर्स पूर्ण करून घेण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या आहेत.


कोर्समध्ये काय शिकवले जाणार?

‘AI साथी फॉर एज्युकेटर्स’ या प्रशिक्षणात शिक्षकांना AI आणि Machine Learning च्या मूलभूत संकल्पनांपासून ते अध्यापनातील प्रत्यक्ष वापरापर्यंत सविस्तर मार्गदर्शन केले जाणार आहे.


मुख्य विषय

कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) म्हणजे काय?

Machine Learning च्या मूलभूत संकल्पना
अध्यापन अधिक परिणामकारक करण्यासाठी AI चा वापर
अध्ययन साहित्य (Learning Material) तयार करण्यासाठी AI साधनांचा उपयोग
विद्यार्थ्यांचे मूल्यमापन आणि अभिप्राय प्रक्रिया
शैक्षणिक आणि प्रशासकीय कामकाजात AI चा जबाबदारीने वापर
डेटा गोपनीयता, सुरक्षितता आणि नैतिकता

banner 325x300

SCERT च्या मते, भविष्यातील शिक्षण व्यवस्थेत AI चा वापर मोठ्या प्रमाणात वाढणार असल्याने शिक्षकांना या तंत्रज्ञानाची ओळख आणि योग्य प्रशिक्षण देणे आवश्यक आहे.

banner 468x60

banner 468x60

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!