banner 728x90

अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघाचा एअर इंडीया व्यवस्थापनाला दणका…

banner 468x60

Share This:

एअर इंडिया एअरपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड व्यवस्थापनाकडून कर्मचाऱ्यांवर होत असलेल्या अन्याय, त्रास व दडपशाही विरोधात अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघाचे अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आणि संघाचे सरचिटणीस सुहास माटे यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवार दि.१८ रोजी विमानतळाजवळ जोरदार आंदोलन करण्यात आले.

यामध्ये शेकडो कर्मचारी सहभागी झाले होते.

कर्मचाऱ्यांच्या या तीव्र आंदोलनामुळे अखेर एअर इंडिया एअरपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड व्यवस्थापनाने कामगारांच्या प्रलंबित मागण्या मान्य केल्या. कामगारांच्या सर्व मागण्या लेखी स्वरूपात मान्य करण्यात आल्याची माहिती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली. यावेळी महाराष्ट्र सचिव राजेंद्र भिसे, अजित आचरेकर उपस्थित होते. तसेच एअर इंडिया एअरपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड व्यवस्थापनाकडून सहाय्यक महाव्यवस्थापक महेश कांबळे, मानव संसाधन व्यवस्थापक सुनीता भरदोज आणि त्यांचे पदाधिकारी उपस्थित होते.

banner 325x300


आंदोलनादरम्यान एअर इंडिया एअरपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड व्यवस्थापनाला प्रत्यक्ष आंदोलनाच्या स्थळी येऊन थेट कामगारांची भेट घेतली. या आंदोलनास सर्व कामगार बांधव व पदाधिकारी यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. “कामगारांच्या एकजुटीमुळेच हा लढा अधिक मजबूत झाला असून भविष्यातही कामगारांच्या हक्कांसाठी संघटना कायम ठामपणे उभी राहील.”असे आश्वासन अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी यावेळी दिले.

banner 468x60

banner 468x60

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!