Breaking News
“कथित सेवा आश्रम संस्थेच्या कारभारावर निर्बंध” धर्मादाय आयुक्तांच्या आदेशांकडे दुर्लक्ष ‘फिट पर्सन’च्या कारभाराबाबत आक्षेप बोईसर मधील कथीत शिक्षण संस्थेत गैरप्रकार : धर्मादाय आयुक्त, शिक्षण विभागाकडे तक्रार ; लेटरहेड, शिक्के, स्वाक्षऱ्यांचा गैरप्रकार उघडकीस शाळा परिसरात हे ड्रिंक विकाल तर व्हाल बर्बाद. राज्य सरकारचा धडाकेबाज निर्णय, तुकाराम मुंढे येताच सरकार ॲक्शन मोडवर संगीत कलाकारांना १० लाख रुपये मिळणार, गायिका आशा भोसले यांच्या नावाने ‘जीवन गौरव पुरस्कार’ सुरू होणार; सरकारचा मोठा निर्णय लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी बातमी! विधानसभेत अखेर विधेयक मंजूर, सरकारचा मोठा निर्णय!
banner 728x90

“कथित सेवा आश्रम संस्थेच्या कारभारावर निर्बंध” धर्मादाय आयुक्तांच्या आदेशांकडे दुर्लक्ष ‘फिट पर्सन’च्या कारभाराबाबत आक्षेप

banner 468x60

Share This:

पालघर-योगेश चांदेकर

पालघरः कथित सेवा आश्रम शिक्षण संस्थेच्या कारभाराबाबत संयुक्त धर्मादाय आयुक्तांनी महत्त्वाचा आदेश दिला आहे. संस्थेच्या प्रशासनासाठी नियुक्त करण्यात आलेल्या ‘फिट पर्सन’ना धर्मादाय आयुक्तांच्या पूर्वपरवानगीशिवाय कोणतेही महत्त्वाचे प्रशासकीय किंवा कर्मचारीविषयक निर्णय घेता येणार नसल्याचे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.
कार्यालयाचे निरीक्षक, शिक्षण अधिकारी आणि सुनील भोईर यांची संस्थेच्या प्रशासनासाठी ‘फिट पर्सन’ म्हणून नियुक्ती करण्यात आली. आदेशानुसार, ‘फिट पर्सन’ना शिक्षक किंवा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या, बदली, पदोन्नती, पदावनती किंवा सेवामुक्ती यासारखे कोणतेही निर्णय धर्मादाय आयुक्तांच्या पूर्वपरवानगीशिवाय घेता येणार नाहीत. तसेच संस्थेचे कोणतेही धोरणात्मक किंवा प्रशासकीय निर्णयही परवानगीशिवाय घेण्यास मनाई करण्यात आली होती. असे असताना धर्मादाय आयुक्तांचे आदेश धाब्यावर बसवण्यात आले.

banner 325x300

मासीक अहवाल सादर करणे बंधनकारक
‘फिट पर्सन’ना संस्थेच्या कामकाजाचा दर महिन्याचा मासीक अहवाल सर्व ‘फिट पर्सन’च्या स्वाक्षरीसह धर्मादाय आयुक्तांकडे सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. याशिवाय, ठाणे येथील उपधर्मादाय आयुक्त आणि दोन निरीक्षकांनी संस्थेच्या प्रशासनाची सखोल चौकशी करून सहा महिन्यांच्या आत अहवाल सादर करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. या आदेशाची तातडीने अंमलबजावणी करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले असून, आदेशाच्या अंमलबजावणीत सहकार्य न करणाऱ्यांविरोधात गंभीर दखल घेतली जाईल, असा इशाराही संयुक्त धर्मादाय आयुक्तांनी दिला होता; परंतु या आदेशाला या कथीत संस्थेने केराची टोपली दाखवली.

लेटरहेडवरील पत्ता बदलाबाबत मार्गदर्शनाची मागणी
सेवा आश्रम शिक्षण संस्था, मुरबेच्या मूळ पत्त्यात बदल करून संस्थेच्या लेटरहेडवर ‘सेवा आश्रम शिक्षण संस्था बोईसर’ असा उल्लेख करण्याच्या सूचनेनंतर या बदलाची कायदेशीरता स्पष्ट करण्यासाठी सहाय्यक धर्मादाय आयुक्तांकडे मार्गदर्शन मागण्यात आले आहे.
सेवा आश्रम विद्यालय, बोईसरच्या मुख्याध्यापकांनी २६ एप्रिल २०२४ रोजी सहाय्यक धर्मादाय आयुक्तांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे, की संस्थेचे फिट पर्सन सुनील भोईर आणि इतरांनी संस्थेच्या पत्रव्यवहाराचा पत्ता बदलण्याच्या आदेश दिला आहे. त्यानुसार, लेटरहेडवर ‘सेवा आश्रम शिक्षण संस्था, मुरबे’ या मूळ पत्त्याऐवजी ‘सेवा आश्रम शिक्षण संस्था, बोईसर, ता. जि. पालघर’ असा बदल करण्यास सांगण्यात आले आहे. पत्रानुसार, २० एप्रिल २०२४ रोजी ‘फिट पर्सन’ शाळेत आले होते. त्यांनी संस्थेच्या पत्रव्यवहाराचा पत्ता बदलून नवीन पत्त्यानुसार लेटरहेड छापण्याचे निर्देश दिले. तसेच हा बदल करून त्याबाबतचा अहवाल तातडीने सादर करण्यासही सांगितल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे; मात्र मुख्याध्यापकांनी या बदलाबाबत कायदेशीर शंका उपस्थित केली आहे. संस्थेच्या लेटरहेडवर असा बदल करण्याचा अधिकार आहे का, तसेच तो करणे योग्य ठरेल का, याबाबत धर्मादाय आयुक्तांनी मार्गदर्शन करावे, अशी विनंती त्यांनी पत्रातून केली परंतु याबाबतचे उत्तर धर्मादाय आयुक्तांकडून आले नाही व यावर कार्यवाही सुद्धा करण्यात आली नाही.

फिट पर्सन सुनील’ भोईर यांचे अधिकार रद्द करण्याची मागणी
सेवा आश्रम शिक्षण संस्था संचलित आनंद लक्ष्मण चंदावरकर विद्यालय, खानिवलीच्या प्रभारी मुख्याध्यापकांनी ‘फिट पर्सन’ सुनील रामचंद्र भोईर यांच्याविरोधात गंभीर तक्रार करत त्यांचे ‘फिट पर्सन’ म्हणून दिलेले अधिकार तात्काळ रद्द करण्याची मागणी धर्मादाय आयुक्त, शिक्षण विभाग आणि पोलिस प्रशासनाकडे केली आहे. यासंदर्भात सविस्तर निवेदन संबंधित अधिकाऱ्यांना पाठविण्यात आले आहे. तक्रारीनुसार भोईर शाळेच्या दैनंदिन कामकाजात वारंवार हस्तक्षेप करत असून शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांशी अर्वाच्य भाषेत बोलणे, धमकावणे आणि मानसिक त्रास देणे, असे प्रकार घडत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे शाळेतील वातावरण बिघडत असून विद्यार्थ्यांच्या शिक्षणावरही परिणाम होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. मुख्याध्यापकांनी आरोप केला आहे, की शाळेच्या आर्थिक व्यवहारांमध्येही फिट पर्सनकडून हस्तक्षेप केला जात आहे. वेतनप्रकरणे, पोषण आहार योजनेचे व्यवहार, विविध अनुदान आणि इतर आर्थिक कामांमध्ये दबाव आणून निर्णय घेतले जात असल्याचा दावा करण्यात आला आहे.

आर्थिक गैरव्यवहार
पोषण आहार योजनेशी संबंधित कंत्राटदारांकडे पैशांची मागणी करण्यात आल्याचाही आरोप करण्यात आला आहे. तसेच कर्मचारी बदली, वरिष्ठ वेतनश्रेणी प्रस्ताव आणि इतर प्रशासकीय कामांमध्ये आर्थिक व्यवहार करण्यासाठी दबाव टाकल्याचा आरोपही करण्यात आला आहे. शाळेतील शैक्षणिक सहल, कार्यालयीन कामकाज आणि विविध प्रशासकीय निर्णयांमध्येही अनावश्यक हस्तक्षेप होत असल्याने शिक्षक आणि कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचे निवेदनात म्हटले आहे. या प्रकरणी अनेक शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी लेखी पाठिंबा दिल्याचाही दावा करण्यात आला आहे. या सर्व आरोपांची स्वतंत्र चौकशी करून भोईर यांच्याकडील ‘फिट पर्सन’चे अधिकार तात्काळ काढून घ्यावेत, तसेच शाळेच्या प्रशासनात होणारा हस्तक्षेप थांबवावा, अशी मागणी तत्कालीन प्रभारी मुख्याध्यापकांनी संबंधित अधिकाऱ्यांकडे केली होती.

banner 468x60

banner 468x60

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!