महाराष्ट्राच्या राजकारणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या (CM Devendra Fadnavis) नावावर पुन्हाएक नवा विक्रम नोंदविण्यातआलाआहे. महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वाधिक काळ मुख्यमंत्री (Maharashtra CM) राहिलेल्या नेत्यांमध्ये देवेंद्र फडणवीस आता तिसऱ्या क्रमांकावर आले आहे . तर मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळाबाबत देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांना (Sharad Pawar) देखील मागे टाकले आहे . 12 जुलै 2026 पर्यंत देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदाचा एकूण कार्यकाळ 2430 दिवस (सुमारे 6 वर्षे 7 महिने) इतका झाला असून, त्यांनी शरद पवार (2, 412 दिवस) यांना मागे टाकत महाराष्ट्राच्या इतिहासात सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहिलेल्या नेत्यांच्या यादीत तिसरे स्थान पटकावले आहे.
त्यांचा कार्यकाळ अद्याप सुरू असल्याने हा विक्रम दररोज वाढत आहे.
विशेष म्हणजे शरद पवार चार वेळा मुख्यमंत्री झाले, मात्र त्यांना एकदाही पूर्ण पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करता आला नाही. तर दुसरीकडे, देवेंद्र फडणवीस तीन वेळा मुख्यमंत्री झाले आहेत. त्यांचा पहिला कार्यकाळ पूर्ण पाच वर्षांचा होता, दुसरा केवळ 6 दिवसांचा, तर तिसरा कार्यकाळ सध्या सुरू असून 12 जुलै 2026 पर्यंत त्याला 585 दिवस पूर्ण झाले आहेत.
Maharashtra CM : महाराष्ट्रातील सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहिलेले नेते
1) वसंतराव नाईक – 4,096 दिवस (11 वर्षे 78 दिवस)
2) विलासराव देशमुख – 2,686 दिवस (सुमारे 7 वर्षे 129 दिवस)
3) देवेंद्र फडणवीस – 2,430 दिवस (सुमारे 6 वर्षे 7 महिने) (12 जुलै 2026 पर्यंत)
4) शरद पवार – 2,412 दिवस (सुमारे 6 वर्षे 221 दिवस)
यामुळे महाराष्ट्राच्या इतिहासात सर्वाधिक काळ मुख्यमंत्रीपद भूषविणाऱ्या नेत्यांमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांना मागे टाकत तिसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे.
नागपूरमधील गंगाधर आणि सरिता फडणवीस यांच्या कुटुंबात 22 जुलै 1970 रोजी देवेंद्र यांचा जन्म झाला. 5 वेळा आमदार राहिलेल्या काकू शोभाताई फडणवीस आणि आमदारकी भूषवलेल्या वडिलांकडून घरातूनच राजकारणाचे धडे गिरवत ते समाजकारणात पुढे आले, सोबतीला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची शिकवणही कुटुंबातून व नागपूरच्या शाखेतून, संघाच्या मुख्यालयातून मिळालेली. त्यामुळे, देवेंद्र फडणवीस यांच्यातील नेतृत्वगुणाचा पाया येथूनच भक्कमपणे रचला गेला. महाविद्यालयीन जीवनातच त्यांनी आपल्यातील नेतृत्वगुणाला चालना दिली. अभाविपचे कार्यकर्ता बनून त्यांनी राजकीय कामाला सुरुवात केली, तर नागपूर विद्यापीठातून कायद्याची पदवी घेत असताना महाविद्यालयीन निवडणुकांमध्येही सक्रीय सहभाग घेतला. सन 1992 साली त्यांनी नागपूर विद्यापीठातून एलएलबीचे शिक्षण पूर्ण केले, याच काळात त्यांना नगरसेवकपदी संधी मिळाली. 1992 ते 97 आणि 1997 ते 2001 या काळात ते नगरसेवक राहिले. याच काळात नागपूरच्या महापौरपदाची माळही त्यांच्या गळ्यात पडली. दरम्यान, महानगरपालिकेच्या निवडणुकांसाठी वार्डातील बूथवरील कार्यकर्ता ही भूमिका देखील देवेंद्र फडणवीस यांनी भूषवली. त्यामुळेच, बूथ कार्यकर्ता ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असा त्यांचा राजकीय प्रवास अत्यंत प्रेरणादायी आहे.


















zzlWzi8qqy8Un4Ec/s320/1001506655.jpg