पालघर-योगेश चांदेकर
पालघर-: संसदीय कार्याची दखल घेत खासदार डॉ. हेमंत विष्णु सवरा यांना जाहीर झालेला प्रतिष्ठेचा ‘संसद रत्न पुरस्कार’ आज नवी दिल्ली येथे प्रदान करण्यात आला. केंद्रीय कोळसा व खाण मंत्री जी. किशन रेड्डी यांच्या हस्ते डॉ. सवरा यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
संसदेत जनतेचे प्रश्न प्रभावीपणे मांडणे तसेच देशहिताच्या विविध विषयांवर केलेल्या संसदीय कार्याची दखल घेत डॉ. सवरा यांना हा सन्मान मिळाला आहे. पुरस्कार स्वीकारल्यानंतर त्यांनी हा गौरव केवळ आपला नसून आपल्यावर विश्वास ठेवणाऱ्या जनतेचा, सहकाऱ्यांचा आणि हितचिंतकांचा असल्याची भावना व्यक्त केली.

सन्मानामुळे अधिक जोमाने काम करू
संसदय कार्याची मिळालेली ही पावती आपल्यासाठी विशेष असल्याचे डॉ. सवरा यांनी सांगितले. जनतेने आपल्यावर ठेवलेल्या विश्वासामुळेच संसदेत विविध प्रश्न सातत्याने मांडण्याची प्रेरणा मिळते. या सन्मानामुळे आगामी काळात अधिक जोमाने आणि जबाबदारीने काम करण्याची नवी ऊर्जा मिळणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
जनसेवा हीच प्राथमिकता
जनतेच्या प्रश्नांना संसदेत प्राधान्य देत देशहिताच्या विषयांवर सातत्याने काम करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. ‘जनसेवा हीच माझी प्राथमिकता आणि राष्ट्रहित हेच माझे ध्येय’, असे त्यांनी या वेळी नमूद केले. ‘संसद रत्न पुरस्कार’ मिळाल्याने डॉ. सवरा यांच्या संसदीय कार्याचा गौरव झाला असून, या सन्मानामुळे त्यांच्या पुढील सार्वजनिक आणि संसदीय वाटचालीला नवी प्रेरणा मिळणार असल्याचे मानले जात आहे.
कोट
‘हा सन्मान केवळ माझा नाही, तर माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकाचा आहे. माझ्या कार्यात सदैव साथ देणाऱ्या जनतेला, सहकाऱ्यांना आणि हितचिंतकांना हा गौरव मनापासून समर्पित करतो.
डॉ. हेमंत सवरा, खासदार, पालघर


















zzlWzi8qqy8Un4Ec/s320/1001506655.jpg