banner 728x90

Driving Licence New Rules : तर थेट ड्रायव्हिंग लायसन्स रद्द होणार, नितीन गडकरींची मोठी घोषणा, नवी पॉइंट सिस्टीम आहे तरी काय?

banner 468x60

Share This:

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री मंत्री नितीन गडकरी हे त्यांच्या निर्णयांमुळे नेहमी चर्चेत असतात. आताही त्यांनी एक मोठा निर्णय घेण्यासंदर्भात सुतोवाच केले आहे.

त्यामुळे आता भारतातील ड्रायव्हिंग लायसन्स आणि वाहन नोंदणी प्रमाणपत्र संदर्भात मोठे बदल होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. रस्ते आणि महामार्ग मंत्रालय यासाठी सर्वात मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे, तो नेमका काय निर्णय असणार यासंदर्भात जाणून घेऊयात. तर मंत्रालय सध्या वाहतूक खात्यात ग्रेडेड पॉईंट सिस्टीम लागू करण्याचा विचार करत आहे की, याबद्दलची माहिती केंद्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे.

काय असणार प्रस्ताव आणि पॉईंट सिस्टीम?

सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्सच्या (SIAM) च्या ६६ व्या वार्षिक संमेलनात बोलताना गडकरींनी या सर्व योजनेबद्दल सविस्तरपणे भाष्य केलं आहे, त्यांनी सांगितल्याप्रमाणे आता वाहतूक नियमांचे उल्लंघन थेट लायसन्सच्या रेकॉर्डशी जोडले जाणार आहे. म्हणजेच आता तुम्ही वाहतूक नियम मोडल्यास त्याचा परिणाम थेट तुमच्या ड्रायव्हिंग लायसन्सवर होणार आहे. तर होईल असे की, या प्रस्तावित यंत्रणेमध्ये वाहतुकीचा नियम मोडल्याची नोंद होईल आणि ड्रायव्हिंग लायसन्समधून ठराविक पॉईंट्स वजा केले जातील. एवढेच नाही तर पेनल्टीचे हे पॉईंट्स एका विशिष्ट मर्यादेपलीकडे गेले तर विभागाला संबंधित चालकाचे लायसन्स सस्पेंड किंवा कायमस्वरुपी रद्द करण्याचाही अधिकार असेल.

banner 325x300

चांगल्या चालकांना काय मिळणार?

दरम्यान, या यंत्रणेमध्ये काही सकारात्मक बाबीही असणार आहेत. ही केवळ दंडात्मक कारवाईपुरती मर्यादित ठेवण्यात आलेली नसून, वाहतूक नियमांचे पालन करुन जबाबदारीने गाडी चालवणाऱ्यांना लायसन्सधारकांना यात बक्षीसही दिले जाणार आहे. ज्या वाहनचालकांचा रेकॉर्ड स्वच्छ असेल, त्यांना विमा कंपन्यांकडून विशेष सवलती दिल्या जाण्याची शक्यता आहे. या बक्षिसाचे नेमके स्वरूप काय असेल, हे अद्यापतरही स्पष्ट झालेले नाही.

चालकांच्या वर्तनावर थेट लक्ष

मंत्री गडकरींनी भारतातील रस्ते सुरक्षा यंत्रणेमधील आव्हानांवरही यावेळी त्यांचे मत मांडले. त्यांनी सांगितले की, भारतात रस्त्यांवर वाहतूक करताना सुरक्षेचा विचार करता चालकांचे वर्तन हा सर्वात मोठा आव्हानाचा मुद्दा आहे. त्यावर आळा घालण्यासाठी आता एकदा चलन कापून भागणार नाही. तर त्याशिवाय अतिरिक्त कारवायाही केल्या जाणार आहे. त्यासाठीच या यंत्रणेचा वापर केला जाणार आहे. यामधून वेगमर्यांदा ओलांडणे, सिग्नल तोडून पळ काढणे अशा सर्व धोकादायक कृत्यांची एकत्रित नोंद केली जाणार आहे. या चुका करणाऱ्यांवर नजर ठेवली जाईल. त्यांच्या वर्तनामध्ये सुधारणा झाली नाही तर त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाणार आहे.

banner 468x60

banner 468x60

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!