मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘एआय इम्पॅक्ट समिट’मध्ये मांडलेल्या डिजिटल क्रांतीच्या आवाहनातून प्रेरणा घेत शिक्षक नेते डॉ. विशाल कडणे यांनी मुंबई भाजप अध्यक्ष आ. अमीत साटम यांच्या मार्गदर्शनाने ५० डिजिटल बोर्डचे वाटप केले आहे. या उपक्रमामुळे मुंबईतील शाळा आता ‘स्मार्ट क्लासरूम’ ने सुसज्ज झाल्या आहेत.
एआयच्या युगात मराठी शाळांनी मागे राहू नये, यासाठी डॉ. विशाल कडणे यांनी पुढाकार घेत मुंबईतील गरजू शाळा शोध घेतला आणि अत्यंत आधुनिक अशा डिजिटल इंटरॅक्टिव्ह बोर्डचे(Digital Boards)मोफत वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. एकूण चार टप्प्यात २०० डिजिटल इंटरॅक्टिव्ह बोर्डचे वाटप करण्यात येणार असून, त्याच्या पहिल्या भागामध्ये ५० बोर्डचे वाटप मुंबई महानगरपालिका शिक्षण समिती अध्यक्षा राजेश्री शिरवडकर यांच्या हस्ते करण्यात आले. विक्रोळी येथील विकास हायस्कुल येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी डॉ. विनय राऊत, सदानंद रावराणे, भगवान सागर, राजेंद्र प्रधान, डॉ. अनघा राऊत, किशोर मराठे यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते.
“आधुनिक अध्यापन पद्धती या ५० डिजिटल बोर्ड्सच्या(Digital Boards) माध्यमातून शिक्षकांना ऑडिओ-व्हिज्युअल तंत्रज्ञानाचा वापर करून कठीण संकल्पना विद्यार्थ्यांना सहजपणे समजावून सांगता येतील.”
– राजेश्री शिरवडकर, शिक्षण समिती अध्यक्षा, बृहन्मुंबई महानगरपालिका
“मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तंत्रज्ञान आणि एआयच्या प्रभावाबाबत जे मार्गदर्शन केले, तेच आमचे प्रेरणास्थान आहे. मुंबईतील प्रत्येक विद्यार्थी हा आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असावा, हे आमचे स्वप्न आहे. ५० डिजिटल बोर्डचे हे वितरण म्हणजे समृद्ध शैक्षणिक महाराष्ट्राच्या दिशेने टाकलेले एक छोटेसे पाऊल आहे.
– डॉ. विशाल कडणे
मुंबईतील शाळांना ५० डिजिटल बोर्डचे मोफत वितरण
Recommendation for You

Post Views : 87 पालघर-योगेश चांदेकर पालघर– वसई तालुक्यातील नामांकित सेवा विवेक संस्थेने आदिवासी महिला…

Post Views : 87 गणपती विसर्जन मिरवणुकांमध्ये आवाजाची निर्मिती होणाऱ्या कोणत्याही उपकरणांचा वापर होणार असेल…

Post Views : 87 पालघर-योगेश चांदेकर पालघर: ‘रॉयल-सिट्रस कंपनी’तील गुंतवणूकदार सभासद आणि प्रतिनिधींना परतावा मिळवून…














zzlWzi8qqy8Un4Ec/s320/1001506655.jpg