Breaking News
मनोज जरांगे यांच्या आंदोलनानंतर सरकारी पातळीवर महत्त्वाच्या हालचाली, चार महत्त्वाचे शासकीय आदेश काढले, मराठा समाजाला काय फायदा मिळणार? Driving Licence New Rules : तर थेट ड्रायव्हिंग लायसन्स रद्द होणार, नितीन गडकरींची मोठी घोषणा, नवी पॉइंट सिस्टीम आहे तरी काय? मनोज जरांगेंच्या आंदोलनाला मोठं यश! विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीबाबत सरकारकडून महत्त्वाचा निर्णय जाहीर वेदमूर्ती गजानन नामजोशी यांचे निधन वेदविद्या, पौरोहित्य आणि संस्कृत परंपरेच्या जतनासाठी आयुष्यभर कार्य त्यांच्या मार्गदर्शनातून पाचशेहून अधिक विद्यार्थ्यांचे वेदाध्ययन …. तर ‘या’ महिलांचा अर्ध्या तिकिटाचा प्रवास बंद ? आजपासून लागू झालेला नवा नियम कोणता ?
banner 728x90

१० वीच्या विद्यार्थ्यांसाठी गूड न्यूज! चित्रकला, लोककलेचे वाढीव गुण मिळवण्यासाठी १५ दिवसांची मुदतवाढ

banner 468x60

Share This:

फेब्रुवारी- मार्चमध्ये होणाऱ्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इयत्ता दहावी) परीक्षेस प्रविष्ट होणाऱ्या शासकीय रेखा ग्रेड परीक्षा (एलिमेंटरी व इंटरमिजिएट) उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी शास्त्रीय कला, चित्रकला व लोककला या विषयांच्या वाढीव गुणांसाठी प्रस्ताव सादर करण्यास १५ दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे.

महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळ यांच्या वतीने घेण्यात येणाऱ्या शासकीय रेखा ग्रेड परीक्षांचा निकाल जानेवारी २०२६ च्या अखेरच्या आठवड्यात जाहीर झाला. त्यानंतर महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, नाशिक विभागीय मंडळाने यंदापासून प्रथमच इयत्ता १० वीच्या विद्यार्थ्यांचे वाढीव कलागुणांचे प्रस्ताव ऑनलाइन पद्धतीने स्वीकारण्याची व्यवस्था केली होती.

मात्र, संबंधित ऑनलाइन संकेतस्थळावर सातत्याने तांत्रिक अडचणी व एरर येत असल्याने अनेक विद्यार्थ्यांना प्रस्ताव सादर करता आले नाहीत. परिणामी, वाढीव कलागुणांपासून विद्यार्थी वंचित राहण्याची भीती निर्माण झाली होती. या पार्श्वभूमीवर, संकेतस्थळ दुरुस्त करून प्रस्ताव सादर करण्याची अंतिम मुदत वाढवावी, अशी मागणी कलाशिक्षक महासंघ यांच्याकडून करण्यात आली होती. या संदर्भातील बातमी ३१ जानेवारीच्या मुख्य अंकात प्रसिद्ध करण्यात आली होती.

या बातमीची दखल घेत, राज्य शिक्षण मंडळाचे सचिव डॉ. दीपक माळी यांच्या स्वाक्षरीचे पत्र विभागीय शिक्षण मंडळ, नाशिक यांना प्राप्त झाले असून, त्यानुसार कला विषयांचे ऑनलाइन प्रस्ताव सादर करण्यासाठी अतिरिक्त १५ दिवसांची मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे इयत्ता १०वीच्या विद्यार्थ्यांना कलेचे अतिरिक्त गुण मिळविण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

या निर्णयाबद्दल विभागातील मुख्याध्यापक, कलाशिक्षक व कलाशिक्षक संघटनांच्या वतीने प्रल्हाद शिंदे हस्तेकार, प्रल्हाद साळुंखे, चंद्रशेखर सावंत, दत्तात्रय सांगळे, सचिन पगार, मिलिंद टिळे, राजेंद्र लोखंडे, प्रदीप अहिरे व प्रशांत ईप्पर यांनी सकाळ माध्यम समूहाचे आभार व्यक्त केले आहेत.

banner 468x60

banner 468x60

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!