जुलै महिन्याच्या पहिल्या दिवशी घरगुती एलपीजी सिलिंडरच्या दरात जनतेला कोणताही दिलासा मिळाला नसला तरी, व्यावसायिक वापरकर्त्यांसाठी (रेस्टॉरंट, खानावळ, हॉटेल इत्यादी) एक चांगली बातमी आहे.
तेल विपणन कंपन्यांनी 19 -किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची किंमत 174 रुपयांनी कमी करून 183.50 रुपये केली आहे.
त्याच वेळी, तेल कंपन्यांनी 14.2 किलोच्या घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दरात कोणताही बदल केलेला नाही आणि त्याचे दर पूर्वीप्रमाणेच आहेत.
19 किलोच्या व्यावसायिक सिलेंडरची किंमती झाल्या कमी
दिल्लीला सर्वाधिक दिलासा मिळाला असून, सिलेंडरची किंमत ₹183.50 ने कमी झाली आहे. लखनौ आणि पाटणा येथेही अशाच प्रकारची कपात लागू करण्यात आली आहे. कोलकाताला किंचित कमी दिलासा (₹174) मिळाला आहे.
इंडियन ऑइलच्या नवीन दरानुसार, 19 किलोच्या व्यावसायिक सिलेंडरची किंमत पूर्वीच्या ₹3,113.50 वरून ₹183.50 ने कमी होऊन ₹2,930 झाली आहे. पाटणामध्ये घरगुती सिलेंडरची किंमत ₹1,031.50 राहील, तर व्यावसायिक सिलेंडर आता ₹3,227 मध्ये उपलब्ध होईल.

















zzlWzi8qqy8Un4Ec/s320/1001506655.jpg