banner 728x90

गुटखा विकणारे आणि खाणारे सावधान, तुकाराम मुंढे यांचा थेट इशारा…

banner 468x60

Share This:

अन्न आणि औषध प्रशासनाचे नवे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी गुटखा विकणाऱ्यांना थेट आपल्या कारवाईतून इशारा दिला आहे. महाराष्ट्रात गुटखा विकणे बेकायदेशीर आहे. अजित पवार हयात असताना राज्यात गुटखा बंदीचा निर्णय घेतला होता.

महाराष्ट्राच्या सीमेला लागून असलेल्या राज्यातून मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात गुटख्याची तस्करी होत असते. दूध, तुप, खाद्य तेल हे टार्गेटवर असताना तुकाराम मुंढे यांनी आता गुटखा विक्रेत्यांना टार्गेटवर घेतले आहे. गुटखा विक्रेत्यांवर थेट गुन्हे दाखल करणे, सुरुच ठेवले आहे.

तसेच गुटखा विक्रेत्यांना आपण कोणत्याही प्रकारे सूट कारवाई दरम्यान देणार नसल्याचं तुकाराम मुंढे यांनी म्हटलं आहे.

महाराष्ट्रात अनेक ठिकाणी गुटख्याच्या व्यसनाने तरुण ग्रासलेले आहेत. बंदी असतानाही गुटखा मोठ्या प्रमाणात विकला जात आहे. कोव्हिड काळात तर गुटखा जास्त किंमतीत विकला जात होता. तिच परिस्थिती आता तुकाराम मुंढे यांनी हाती कमान घेतल्यानंतर तयार होणार आहे. कारण बाजारात चोरुन लपून विकला जाणारा गुटखा होता तो देखील बंद होणार आहे.

banner 325x300


कारण अनेक ठिकाणी गुटख्याची वाहतूक केली जाताना पकडले जात आहेत. धाडी पडत आहेत. गुटखा विक्रेत्यांवर मोठ्या प्रमाणात गुन्हे दाखल होत आहेत. प्रशासनापासून लपून गुटखा विकण्याचे प्रमाण खूप जास्त आहे. गुजरात, मध्य प्रदेश, कर्नाटक, आंध्र प्रदेश या राज्यातून सीमावर्ती भागाकडून गुटखा हा महाराष्ट्रात येत असतो.

गुटख्याने तरुणांचे आरोग्य निश्चितच धोक्यात आले आहे. दातांचे आरोग्य तर खूपच आतापासून खराब झाल्याचे दिसत आहे. तोंडाच्या कॅन्सरचे प्रमाण वाढत चालले आहेत. शासनाने गुटखा खाणे आणि विक्रीवर बंदी आणली असली तरी त्याची प्रशासनाकडून तशी अंमलबजावणी केली जात नव्हती.

अखेर तुकाराम मुंढे यांच्यासारखे धाडसी आणि कर्तबगार अधिकारी आल्यानंतर आता गुटखा देखील डोळ्याला दिसेनासा होणार आहे. यामुळे ग्रामीण भागातील गुटख्याचं वाढत जाणारं व्यसन नक्कीच कमी होण्यास मदत होईल असं बोलले जात आहे. मात्र तुकाराम मुंढे यांना या विभागात किती दिवस काम करु दिले जाईल, त्यांची बदली तर होणार नाही ना, असे अनेक कयास मांडले जात आहेत.

banner 468x60

banner 468x60

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!