banner 728x90

नीट पेपरफुटीचा दणका, थेट नरेंद्र मोदी यांचा मोठा निर्णय, खासदारांना युवकांबद्दल दिला कानमंत्र..

banner 468x60

Share This:

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एनडीएमधील खासदारांना मोठा कानमंत्र दिला. बुधवारी एनडीएच्या 37 खासदारांसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संवाद साधला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी काही गोष्टींवर थेटपणे बोलताना दिसले.

त्यांनी आपले अनुभव देखील यावेळी सांगितले. नरेंद्र मोदी यांनी म्हटले की, छोटीशी चूकही खूप मोठी समस्या बनू शकते. खासदारांनी चुकीचा गोष्टीमध्ये पकडण्यापासून वाचले पाहिजे. अयोग्य पाहुणचार स्वीकारण्याबाबत सल्ला दिला. नरेंद्र मोदी यांनी पुढे म्हटले की, आपले लेटरहेड किंवा सही चुकीच्या लोकांच्या हाती पडू न देण्याबाबत खूप जास्त सावध राहिले पाहिजे. राजकारणात विश्वास निर्माण करणे कठीण असते. पण गमवायला काहीच वेळ लागत नाही. संसदेत जास्तीत जास्त उपस्थित राहणे आणि संवाद वाढवला पाहिजे.

banner 325x300

फक्त संसदेत उपस्थित राहणे हेच काम नसते तर जास्तीत जास्त लोकांमध्ये जाणे, त्यांच्यासोबत संवाद साधणेही महत्वाचे असते. जर संसदेत विरोधकांकडून काही टीका झाली तर त्यांच्यासोबत लगेचच भांडणे करण्याऐवजी त्यांना समजून सांगा. यादरम्यान नरेंद्र मोदी यांना लोकांचे मन जिंकण्यावर अधिक भर दिला. लोकांसोबत संवाद साधा आणि त्यांचे मन जिंका असेही त्यांनी म्हटले.

युवकांबद्दलही त्यांनी खास संदेश दिला. त्यांनी म्हटले की, युवकांचे ऐकले पाहिजे. त्यांच्या समस्या जाणून घेतल्या पाहिजेत, तरच समाधान मिळेल. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर सरकार अधिक सर्तक झाले. युवकांचे प्रश्न जाणून घ्या त्याच्यासोबत संवाद वाढवा, असेही थेटपणे नरेंद्र मोदी यांनी खासदारांना म्हटले. मतदार संघात फिरण्याच्याही सूचना दिल्या.

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा म्हणजे सरकारसाठी मोठा झटका आहे. 12 वर्षातील हा पहिला राजीनामा ठरला. नीट पेपरफुटीच्या मुद्द्यात सरकारला एक मोठ फटका बसला. कॉकरोच जनता पार्टीने मोठे आंदोलन देशभरात उभे केले. धर्मेद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी कॉकरोच जनता पार्टी पहिल्या दिवसापासूनच आग्रही होती. शेवटी सरकारवरील दबाव प्रचंड वाढला आणि त्यांना धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा लागला.

banner 468x60

banner 468x60

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!