banner 728x90

“सेवा आश्रम शिक्षण संस्थेच्या ‘फिट पर्सन’ नियुक्तीवरून नवा वाद” मुरबे येथील संस्थेच्या नावाने नियुक्ती,बोईसरच्या नावाने कारभार!

banner 468x60

Share This:

पालघर-योगेश चांदेकर

शिक्षणाधिकारी अशोक पाटील यांच्या नियुक्ती पत्रातही चूक

banner 325x300

पालघरः सेवा आश्रम शिक्षण संस्थेच्या ‘फिट पर्सन’ नियुक्तीच्या आदेशावरून नवा वाद निर्माण झाला आहे. धर्मादाय सहआयुक्त, बृहन्मुंबई विभाग यांनी पारित केलेल्या आदेशानुसार जिल्हा शिक्षण अधिकारी (माध्यमिक), जिल्हा परिषद पालघर यांची ‘सेवा आश्रम शिक्षण संस्था, मुरबे’ या नोंदणीकृत न्यासासाठी ‘फिट पर्सन’ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. आदेशातही न्यासाचे नाव स्पष्टपणे ‘सेवा आश्रम शिक्षण संस्था, मुरबे’ असेच नमूद आहे; परंतु ते कारभार मात्र सेवा आश्रम शिक्षण संस्थेच्या बोईसर या नावाने पाहत आहेत.

दरम्यान आदेशाचा गैरवापर होत असल्याचा आरोप आहे. आरोपानुसार, अर्जदार सुनील भोईर आणि अशोक उंबरे यांनी किरकोळ अर्ज दाखल करताना स्वतःची ओळख ‘फिट पर्सन, सेवा आश्रम शिक्षण संस्था, बोईसर’ अशी दिली. प्रत्यक्षात आदेश आणि अर्जातील न्यासाचे नाव ‘सेवा आश्रम शिक्षण संस्था, मुरबे’ असल्याने ‘बोईसर’ नावाचा वापर दिशाभूल करणारा असल्याचा दावा करण्यात येत आहे. शिक्षणाधिकारी अशोक पाटील यांची नियुक्तीही सेवा आश्रम शिक्षण संस्था, मुरबे या न्यासासाठी ‘फिट पर्सन’ म्हणून करण्यात आलेली असतानाही, ते ‘सेवा आश्रम शिक्षण संस्था, बोईसर’ या नावाचे लेटरहेड, शिक्का आणि स्वाक्षरी वापरत असल्याचे समोर आले आहे यावरून अशोक पाटील यांनी चॅरिटी कमिशनर यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवली आहे.

आदेशाचा चुकीचा अर्थ
तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार, धर्मादाय सहआयुक्तांच्या आदेशात ‘मुरबे’ या न्यासाचा स्पष्ट उल्लेख असूनही ‘बोईसर’ नावाने व्यवहार केल्यामुळे आदेशाचा चुकीचा अर्थ लावला जात आहे. यामुळे भविष्यात कायदेशीर आणि प्रशासकीय गुंतागुंत निर्माण करण्यासाठी मुदामहून असे केल्याचे म्हटले आहे. दरम्यान, माजी संयुक्त धर्मादाय सहआयुक्तांनी निवृत्तीपूर्वी हा आदेश दिला असून, त्यातील नावांच्या वापराबाबत संभ्रम निर्माण झाल्याचा आरोपही संबंधितांनी केला आहे; मात्र या आरोपांबाबत संबंधित ‘फिट पर्सन’ किंवा शिक्षण अधिकाऱ्यांची अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाही. त्यांच्यांशी संपर्क साधूनही त्यांनी प्रतिसाद दिलेला नाही.

धर्मादाय आयुक्तांचा आदेश काय?
धर्मादाय सहआयुक्त, बृहन्मुंबई विभाग, मुंबई यांनी दाखल करण्यात आलेला किरकोळ अर्ज क्रमांक १७७/२०२५ मंजूर करत जिल्हा परिषद पालघर येथील शिक्षण अधिकारी (माध्यमिक) यांना सेवा आश्रम शिक्षण संस्था, मुरबे संस्थेचा ‘फिट पर्सन’ म्हणून पुढील आदेश होईपर्यंत कामकाज करण्याचे निर्देश दिले आहेत. यापूर्वी संस्थेच्या ‘फिट पर्सन’ म्हणून शिक्षणाधिकारी संगीता भागवत यांची नियुक्ती करण्यात आली होती; मात्र शासनाच्या प्रशासकीय बदली आदेशानुसार त्यांची बदली जालना जिल्हा परिषदेत झाल्यानंतर त्यांच्या जागी अशोक पाटील यांची शिक्षण अधिकारी (माध्यमिक), जिल्हा परिषद पालघर या पदावर नियुक्ती झाली. त्यामुळे संस्थेच्या दैनंदिन प्रशासनात कोणताही अडथळा निर्माण होऊ नये आणि कारभार सुरळीत सुरू राहावा, या उद्देशाने नवीन शिक्षण अधिकाऱ्यांची ‘फिट पर्सन’ म्हणून नियुक्ती करण्याची मागणी अर्जाद्वारे करण्यात आली होती.
या आधीच्या ACC पालघर यांच्या 21/2024 मधील 20/06/24 च्या आदेशानुसार तसेच Jt. CC 13/24 च्या 29/10/2025 च्या आदेशानुसार फिट पर्सनची सेवा आश्रम शिक्षण संस्था मुरबे चे बोईसर करण्याची मागणी फेटाळलेली असतांना व फिट पर्सन हा ट्रस्टी नव्हे पत्ता बदलण्याचा अधिकार ट्रस्टी चा आहे असे स्पष्ट आदेश असतांना चॅरिटीचे आदेश धुडकावून सरास सेवा आश्रम शिक्षण संस्था बोईसर ह्या अस्तित्वात नसलेल्या संस्थेच्या नावाचा वापर केला जातं आहे.

पाटील यांची नियुक्ती का?
सुनावणीदरम्यान धर्मादाय सहआयुक्तांनी यापूर्वीचे आदेश, शासनाने काढलेले बदली आदेश तसेच सादर करण्यात आलेली कागदपत्रे तपासून पाहिली. त्यामध्ये भागवत यांची बदली आणि अशोक पाटील यांची पालघर येथे नियुक्ती झाल्याची बाब स्पष्ट झाल्याने, संस्थेच्या व्यवस्थापनात सातत्य राखण्यासाठी विद्यमान शिक्षण अधिकाऱ्यांनाच ‘फिट पर्सन’ म्हणून जबाबदारी देणे योग्य असल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले आहे.

banner 468x60

banner 468x60

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!