banner 728x90

Operation Tiger पार्ट 2, ठाकरेंचे 14 आमदार शिंदेंच्या रडारवर, महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या भूकंपाचे संकेत

banner 468x60

Share This:

राज्यात नवरात्रीआधी मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे. राज्यात फोडाफोडीचं राजकारण सुरूच असल्याचे पाहायला मिळत आहे. एकीकडे शिंदे गटाने मुंबईच्या महापौरपदासाठी फिल्डिंग लावल्याची माहिती आहे.

त्यानंतर आता शिंदे गट हे ठाकरेंचे आमदार देखील फोडणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. काही महिन्याआधी ठाकरेंच्या 6 खासदारांनी शिंदे गटाला साथ दिली. आता आमदार साथ सोडणार असल्याचा दावा करण्यात आल्याने ठाकरेंचं टेन्शन वाढण्याची शक्यता आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ठाकरेंचे १४ आमदारांना शिंदेंच्या शिवसेनेत आणण्याची जबाबदारी तीन मंत्र्यांवर सोपवण्यात आली आहे.
कोकण, मराठवाडा , पश्चिम महाराष्ट्रातील मंत्र्यांवर ऑपरेशन टायगरची जबाबदारी दिली आहे. यापैकी ५ आमदारांना सरकारमध्ये चांगली खाती आणि मंत्रि‍पदे हवी आहेत, अशी माहिती मिळत आहे. तर काहींची महामंडळ अध्यक्ष आणि राज्यमंत्रीपदी वर्णी लागण्यावर पक्षांतर्गत चर्चा अंतिम टप्प्यात पोहोचल्याची माहिती आहे. नवरात्रीपूर्वी या आमदारांचा पक्ष प्रवेश झाल्यास ठाकरे यांच्या शिवसेनेला आणखी एक धक्का बसण्याची शक्यता आहे.

banner 325x300

महापौरपदासाठी शिंदे गटाकडून फिल्डिंग

मुंबई महापालिकेतील महापौरपदासाठी शिंदे गटाने फिल्डिंग लावल्याची माहिती आहे. पालिकेत अडीच वर्षांसाठी शिंदे गटाचा महौपार होणार असल्याची माहिती हाती आहे. यासाठी महायुतीत या पदासाठी सव्वा-सव्वा वर्षांचा फॉर्म्युला ठरल्याचे सांगण्यात आलं आहे. पालिकेचा निवडणूक लागल्यानंतर महायुतीच्या बैठकीत भाजपने शिंदे गटाला शब्द दिला होता, अशी सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे अडीच वर्ष पूर्ण झाल्यानंतर सव्वा वर्ष शिंदे गटाचा महापौर होणार असल्याची जोरदार चर्चा आहे. यासाठी शिंदेंच्या शिवसेनेने देखील रणनीती आखल्याची माहिती समोर आली आहे.

तत्पूर्वी, काही महिन्यांपूर्वी ठाकरेंच्या सहा खासदारांनी शिंदे गटाला साथ दिली. मशाल चिन्हावर निवडून येऊन या खासदारांनी शिंदे गटात प्रवेश केला. या पक्षप्रवेशाने देशातील सर्व नागरिकांच्या भुवया उंचावल्या होत्या. बंडखोर खासदारांनी संसदेत वेगळा गट देखील स्थापन केल्याचं सांगण्यात आलं. एकापाठोपाठ लोकप्रतिनिधी ठाकरेंची साथ सोडत असल्याने पक्षप्रमुखांचं टेन्शन वाढल्याचे बोलले जात आहे. आता आमदारांना रोखण्यासाठी उद्धव ठाकरे काय भूमिका घेतात, हे पाहावे लागेल.

banner 468x60

banner 468x60

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!