राज्याच्या सर्वांगीण विकासाला गती देण्यासाठी महाराष्ट्र मंत्रिमंडळाने महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत १७७ तालुक्यांमध्ये विकास कार्यक्रम राबवण्यासह कृषी, आपत्ती व्यवस्थापन, लोकायुक्त आणि लोककल्याण अशा अनेक प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या महाराष्ट्र मंत्रिमंडळ बैठकीत राज्याच्या संतुलित आणि सर्वांगीण विकासाला गती देण्यासाठी पाच महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. ज्यामध्ये आरोग्य, पोषण, शिक्षण, कृषी, पायाभूत सुविधा आणि सामाजिक विकास या गोष्टींवर विशेष भर देण्यात आला आहे.
१७७ तालुक्यांना ५ कोटी रुपयांचा निधी
मंत्रिमंडळाने १० जिल्ह्यांमधील निवडक १७७ तालुक्यांमध्ये एक वर्षासाठी महत्त्वाकांक्षी तालुका कार्यक्रम राबवण्याचा निर्णय घेतला आहे. या अंतर्गत प्रत्येक तालुक्याला ५ कोटी रुपयांचा विशेष निधी दिला जाणार आहे. तसेच आरोग्य, पोषण, शिक्षण, कृषी, पायाभूत सुविधा आणि सामाजिक विकास यासंबंधीच्या ३९ निकषांवर कामगिरीचे मूल्यांकन केले जाईल. त्याचबरोबर २०२७-२८ या शैक्षणिक वर्षात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या तालुक्यांना २ कोटी ते १० कोटी रुपयांपर्यंतचे प्रोत्साहनपर पुरस्कार देखील दिले जाणार असून कामगिरीच्या आधारावर ११ कोटी ते २१ कोटी रुपयांपर्यंतचे प्रोत्साहनपर पुरस्कार दिले जातील.
शासकीय फलोत्पादन महाविद्यालय उभारणार
नागपूर जिल्ह्यातील काटोल येथे डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाशी संलग्न शासकीय फलोत्पादन महाविद्यालय स्थापन करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. यामध्ये दरवर्षी १२० विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाईल. महाविद्यालयासाठी ५१ नियमित जागा मंजूर करण्यात आल्या असून, गरजेनुसार कंत्राटी जागाही भरल्या जातील. या प्रकल्पासाठी १२२.३२ कोटी रुपयांची आर्थिक तरतूद मंजूर करण्यात आली आहे. यामुळे फळे, भाजीपाला आणि फुले, तसेच प्रक्रिया आणि मूल्यवर्धन या क्षेत्रांतील शिक्षण आणि संशोधनाला चालना मिळेल, असा विश्वास आहे.
एनडीआरएफला तीन हेक्टर जमीन
पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात असलेल्या सादुंबरे गावात राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाला (एनडीआरएफ) तीन हेक्टर शासकीय जमीन विनामूल्य देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या जागेवर कायमस्वरूपी एनडीआरएफ केंद्र स्थापन केले जाणार आहे.

zzlWzi8qqy8Un4Ec/s320/1001506655.jpg