banner 728x90

तलासरी पोलिसांकडून घरफोडीचा अवघ्या ४८ तासांत छडा

banner 468x60

Share This:

पालघर-योगेश चांदेकर

banner 325x300

करजगाव घरफोडी प्रकरणातील अल्पवयीन आरोपीसह, तीन लाखांचा मुद्देमाल जप्त

पालघरः तलासरी तालुक्यातील करजगाव, पाटील पाडा येथे घरफोडी करून त्यात तीन लाख रुपयांचा मुद्देमाल चोरला होता. पोलिस अधीक्षक यतीश देशमुख यांनी या प्रकरणात लक्ष घातल्यानंतर अवघ्या ४८ तासांत या प्रकरणातील संशयित आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून त्याच्याकडून तीन लाख दहा हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

दरम्यान अजय नरेश घुटे हे पाटीलपाडा, करजगाव हे त्यांचे राहते घर बंद करून त्यांच्या दुकानात गेले होते. घरी कुणी नाही, याबाबत पाळत ठेवून १६ ‍वर्षांच्या मुलाने त्यांच्या घराच्या पाठीमागील दरवाजा तोडला. घरात प्रवेश करून लोखंडी कपाट तोडले. त्यातील तीन लाख रुपयांची रक्कम चोरून नेली. या प्रकरणी तलासरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

विशेष पथकाची कामगिरी
जिल्हा पोलिस अधीक्षकांनी याबाबत तलासरी पोलिसांना तातडीने या प्रकरणाचा तपास करण्याचा आदेश दिला. त्यांच्या सूचनेनुसार या प्रकरणाचा त तपास करण्यासाठी तलासरी पोलिसांनी एक विशेष पोलिस पथक तयार केले. या परिसरातील सीटीव्ही कॅमेरे, गोपनीय माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे एका अल्पवयीन मुलाकडे संशयाची सुई जात होती. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याच्याकडून तीन लाख रुपये रोख, दहा हजार रुपये किमतीचा मोबाईल आणि पाचशे रुपये किमतीची बॅग असा एकूण तीन लाख दहा हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

देशमुख यांच्या काळात तपासाची वाढली गती
पालघर जिल्ह्यात यतीश देशमुख पोलिस अधीक्षक म्हणून आल्यानंतर त्यांनी जिल्ह्यातील गुन्हेगारीला बऱ्यापैकी आळा घालण्यात यश मिळवले आहे. वारंवार विविध पोलिस ठाण्यांना मार्गदर्शन करून तपासाची सूत्रे कशी फिरवावीत याचे निर्देश ते देत असतात. पालघर जिल्ह्याला मुख्यमंत्र्यांच्या योजनेतील पहिल्या क्रमांकाचे बक्षीसही देशमुख यांच्या काळातच मिळाले. आत्ताच्या करजगाव घटनेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच अपर पोलिस अधीक्षक विनायक नरळे, उपविभागीय पोलीस अधिकारी अंकिता कणसे यांच्या मार्गदर्शनाखाली तलासरी पोलिस ठाण्याचे प्रभारी पोलिस निरीक्षक अजय गोरड, पोलिस उपनिरीक्षक विष्णू राजड, संदीप नांगरे, अनिल सोनवणे, योगेश मुळे यांच्या पथकाने अवघ्या ४८ तासात घरफोडीचा तपास करून मुद्देमाल जप्त केला. त्यांच्या कामगिरीचे कौतुक होत आहे.

banner 468x60

banner 468x60

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!