banner 728x90

शाळा परिसरात हे ड्रिंक विकाल तर व्हाल बर्बाद. राज्य सरकारचा धडाकेबाज निर्णय, तुकाराम मुंढे येताच सरकार ॲक्शन मोडवर

banner 468x60

Share This:

गुटखा, पानमसाला, सिगारेट या वस्तू शाळा परिसरात विक्रीस बंदी आहे. त्यात आता स्टिंग या शीतपेयाचा, सॉफ्ट ड्रिंकचाही समावेश झाला आहे.

हे शीतपेय शाळेच्या परिसरात विक्री केल्यास धडक कारवाई होऊ शकते. अन्न आणि औषध प्रशासनाची सूत्र तुकाराम मुंढे यांनी हाती घेतल्यानंतर राज्य सरकारने एक धडाकेबाज निर्णय घेतला आहे. अन्न आणि औषध प्रशासन खात्याचे मंत्री नरहरी झिरवळ यांनी याविषयीचे निर्देश दिले आहेत.

स्टिंग पेय विक्रीला बंदी

राज्यात शाळा परिसरामध्ये स्टिंग पेय विक्रीला बंदी घालण्यात आली आहे. शाळांच्या 500 मीटर परिसरामध्ये स्टिंग विक्रीसाठी बंदी घालण्यात आली आहे. आमदार विक्रम पाचपुते यांनी याविषयीचा प्रश्न उपस्थित केला होता. याविषयीची माहिती मंत्री नरहरी झिरवळ यांनी दिले. त्यांनी स्टिंग पेय विक्रीला बंदीचे निर्देश दिले आहे.

banner 325x300

स्टिंगवर बंदी का?

स्टिंग या सॉफ्ट ड्रिंकवरून आमदार विक्रम पाचपुते यांनी प्रश्न उपस्थित केला. कॅफेन आणि शुगरच चे कॉन्बिनेशन आहे ते मुलांना अडिक्ट करण्यासारखं आहे. याच कॉम्बिनेशन धोकादायक आहे म्हणून हा प्रश्न उपस्थित करत आहोत. याचे नमुने घेऊन चाचण्या करण्यात आल्या होत्या ते घातक आहे हे कंपनी स्वत: मान्य करत असल्याचा दावा आमदार पाचपुते यांनी केला आहे. पाचपुते यांनी याप्रकरणी सरकारला तीन प्रश्न विचारले होते.

१८ वर्षाखालील मुलाना स्टिंग विक्रीस मान्यता देण्यात येऊ नये यासाठी काही नियम करणार आहोत का ?

आयुक्तांना तसे अधिकार आहेत त्यांना सूचना देण्यात येणार का ?

दारूपेक्षाही घातक हे स्टिंग आहे.

विद्यार्थ्यांमध्ये जागृती

स्टिंग शाळेच्या आवारात विकल जाते हे काही अंशी खरं आहे. पण मागील ८ ते १० दिवसापासून शाळेतील शिक्षक आणि प्राचार्य यांना आम्ही मुलांना याबाबत माहिती देऊन त्याबद्दल सांगायला सांगितलं आहे, जेणेकरून विद्यार्थी ते खरेदी करणार नाहीत, अशी माहिती मंत्री नरहरी झिरवळ यांनी दिली.

भास्कर जाधव यांचा आक्षेप

एफडीएच्या लॅब किती आहेत आणि त्या अपुऱ्या आहेत का आणि स्थिती काय आहे, अशी विचारणा आमदार राहुल कुल यांनी केली. मंत्री नरहरी झिरवळ यांनी यावर उत्तर देताना तुकाराम मुंढे यांचा उल्लेख मुंढे साहेब मुंढे साहेब असा उल्लेख करत होते, त्यावर भास्कर जाधव यांनी आक्षेप घेतला. तुम्ही कॅबिनेट मंत्री आहात मुंढे साहेब काय म्हणता मुंढे म्हणा, असे ते म्हणाले.

banner 468x60

banner 468x60

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!