Breaking News
ऑपरेशन टायगर आधीच उद्धव ठाकरे गटासाठी वाईट बातमी, आमदार-खासदाराचं भांडण चव्हाट्यावर, राजकीय भूकंपाचे स्पष्ट संकेत लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपींना पॅरोल बंद करण्याच्या हालचाली; मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्र्यांचे निर्देश “युवासेनेच्या लोकसभाध्यक्षदी चेतन धानेमेहेर यांची नियुक्ती” युवासेनेच्या माध्यमातून एकनाथ शिंदे यांचा विश्वास सार्थ ठरवणार पदनियुक्ती ही मोठी जबाबदारी असल्याची जाणीव Maharashtra Board Digital Exam Plan: कागद नाही, आता फक्त स्क्रीन! दहावी-बारावी बोर्डाच्या परीक्षा होणार पेपरलेस! कधीपासून होणार अंमलबजावणी? Maharashtra Weather : महाराष्ट्रात हवामानाचा दुहेरी फटका; कोकणात उष्णतेचा कहर तर विदर्भात गारपिटीचा इशारा
banner 728x90

“युवासेनेच्या लोकसभाध्यक्षदी चेतन धानेमेहेर यांची नियुक्ती” युवासेनेच्या माध्यमातून एकनाथ शिंदे यांचा विश्वास सार्थ ठरवणार पदनियुक्ती ही मोठी जबाबदारी असल्याची जाणीव

banner 468x60

Share This:

पालघर-योगेश चांदेकर

पालघरः पालघर जिल्ह्यात युवासेनेच्या माध्यमातून संघटनात्मक बळकटी देण्याच्या दृष्टीने चेतन धानमेहेर यांची पालघर-डहाणू लोकसभा अध्यक्षपदी झालेली निवड ही केवळ पदनियुक्ती नसून, एक मोठी जबाबदारी आणि अपेक्षांची शिदोरी घेऊन आलेली घटना आहे. बदलत्या राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर ही निवड अधिकच महत्त्वाची ठरते.
शिवसेनेच्या परंपरेत कार्यकर्त्यांच्या बळावर उभी राहिलेली संघटनात्मक रचना हीच खरी ताकद मानली जाते. दिवंगत आनंद दिघे यांनी ठाणे जिल्ह्यात उभी केलेली कार्यपद्धती, तळागाळाशी नाळ जपणारी, कार्यकर्त्यांना केंद्रस्थानी ठेवणारी असून आजही ती आदर्श मानली जाते. त्याच पद्धतीने एकनाथ शिंदे यांनी संघटन विस्ताराचे धडे घेतले आणि ते राज्यपातळीवर यशस्वीपणे राबवले.

banner 325x300

परंपरेचा वारसा धानमेहेर यांच्या खांद्यावर
अशा या परंपरेचा वारसा पुढे नेण्याची जबाबदारी आता चेतन धानमेहेर यांच्या खांद्यावर आली आहे. पालघर हा भौगोलिकदृष्ट्या विस्तीर्ण आणि सामाजिकदृष्ट्या विविधतेने नटलेला जिल्हा आहे. आदिवासी भाग, किनारपट्टी आणि वाढते शहरीकरण या तिन्ही घटकांमध्ये समतोल राखत संघटन वाढवणे हे मोठे आव्हान आहे. अशा परिस्थितीत केवळ पद मिळणे पुरेसे नसून, त्या पदाला न्याय देण्यासाठी सातत्यपूर्ण संपर्क, स्थानिक प्रश्नांची जाण आणि कार्यकर्त्यांशी सुसंवाद आवश्यक ठरतो. तो धानमेहेर यांच्याकडे आहे.

तिहेरी कसरत
चेतन धानमेहेर यांच्यासाठी सर्वात मोठे आव्हान म्हणजे शिंदे गटाची संघटनात्मक पाळेमुळे अधिक मजबूत करणे. स्थानिक पातळीवर विश्वासार्ह नेतृत्व उभे करणे, नव्या युवकांना संघटनेत सामील करणे आणि जुने कार्यकर्ते यांना एकत्र ठेवणे ही तिहेरी कसरत त्यांना साधावी लागणार आहे. राजकीय पातळीवर होणारे बदल आणि त्यातून निर्माण होणारी स्पर्धा लक्षात घेता, संघटनात्मक एकजूट राखणे ही काळाची गरज आहे.

युवकांना जोडणारे व्यासपीठ
युवासेना ही केवळ राजकीय शाखा नसून, युवकांच्या आकांक्षा आणि ऊर्जेचे प्रतिनिधित्व करणारे व्यासपीठ आहे. त्यामुळे रोजगार, शिक्षण, स्थानिक विकास यांसारख्या प्रश्नांवर ठोस भूमिका घेऊन काम करणे आवश्यक ठरेल. संघटन वाढवताना केवळ संख्यात्मक वाढ न करता गुणवत्तापूर्ण नेतृत्व निर्माण करणे हीदेखील तितकीच महत्त्वाची बाब आहे. धानमेहेर यांच्याकडून अपेक्षा केवळ संघटन विस्ताराची नाही, तर संघटनाला दिशा देण्याची आहे. आनंद दिघे यांची लोकाभिमुख कार्यपद्धती आणि एकनाथ शिंदे यांची जिद्द व संघटन कौशल्य हे दोन आदर्श डोळ्यासमोर ठेवून त्यांनी काम केल्यास पालघर जिल्ह्यात शिवसेनेच्या शिंदे गटाला नवी ऊर्जा मिळू शकते.

नेतृत्वाचा कस
धानमेहेर यांची निवड ही एक संधी आहे. आता ती संधी कार्यात रूपांतरित करून दाखवणे, हाच त्यांच्या नेतृत्वाचा खरा कस असेल. जिल्ह्यात युवासेनेच्या संघटनात्मक विस्ताराला आणि बळकटीस नवसंजीवनी देण्याच्या उद्देशाने नव्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे. या नियुक्त्यांमुळे स्थानिक पातळीवर संघटना अधिक सक्रिय आणि प्रभावी होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

तळागाळातील कार्यकर्त्यांना संधी
शिंदे यांच्या आदेशानुसार आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेना कार्याध्यक्ष पुर्वेश सरनाईक यांनी या नियुक्त्या जाहीर केल्या. जिल्ह्यातील संघटनात्मक रचना अधिक सक्षम करण्यासाठी आणि तळागाळातील कार्यकर्त्यांना नेतृत्वाची संधी देण्याच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे. या नव्या नियुक्त्यांमध्ये साईराज पाटील यांची पालघर व डहाणू विधानसभा अध्यक्षपदी पुनर्नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या कामकाजाचा अनुभव आणि संघटनातील सातत्य लक्षात घेऊन त्यांच्यावर पुन्हा विश्वास दाखवण्यात आला आहे. तसेच चेतन धानमेहेर यांची पालघर-डहाणू लोकसभा अध्यक्षपदी निवड करण्यात आली असून, आगामी काळात संघटन विस्तार आणि कार्यकर्त्यांशी समन्वय साधण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली आहे.

अन्य जबाबदाऱ्या
कुमार माळी यांची पालघर-डहाणू विधानसभा जिल्हा निरीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. संघटनेतील विविध घटकांमध्ये समन्वय राखणे आणि कार्यप्रणालीवर लक्ष ठेवणे ही त्यांची प्रमुख भूमिका असेल. घिवली येथील उपसरपंच भावेश धर्ममेहेर यांची पालघर विधानसभा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली असून, स्थानिक नेतृत्व अधिक सक्षम करण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात आला आहे.

banner 468x60

banner 468x60

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!