मुंबई : मोदी सरकारच्या दुसऱ्या पर्वातील केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला आहे. या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये अनेक नव्या चेहऱ्यांना मोदी सरकारने आपल्या मंत्रिमंडळात संधी दिली आहे. यामध्ये 15 कॅबिनेट आणि 28 राज्य मंत्र्यांना शपथ देण्यात आली आहे. त्यात महाराष्ट्रातील एकूण 4 नेत्यांना केंद्रात मंत्रीपद मिळालं आहे. त्यावरून आता राज्यात सत्तेत असलेल्या महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मंत्रीमंडळ विस्तारावर टीका केली आहे.
Home
पालघर
'बिघडलंय तर इंजिन आणि बदलले डबे..! व्वा मोदीजी व्वा !’, मंत्रिमंडळाच्या विस्तारनंतर महाविकास आघाडीची टीका
‘बिघडलंय तर इंजिन आणि बदलले डबे..! व्वा मोदीजी व्वा !’, मंत्रिमंडळाच्या विस्तारनंतर महाविकास आघाडीची टीका
‘बिघडलंय तर इंजिन आणि बदलले डबे..! व्वा मोदीजी व्वा !’ , अशी बोचरी टीका काँग्रेसच्या नेत्या आणि राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी केली आहे. तर राजीनामा दिलेल्या मंत्र्यांची नावे आणि नव्याने मंत्रीपदी विराजमान होणाऱ्यांची नाव वाचून असं वाटतंय इथून पुढे आयारामांना पक्ष सदस्य होण्यापूर्वी मंत्रीपदाची शपथ दिली जाईल, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर केली आहे.
केंद्रीय मंत्रिमंडळात भाजपचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांना स्थान देण्यात आले. कोकणात शिवसेनेला शह देण्यासाठी नारायण राणे यांना मंत्रीपद देण्यात आल्याच्या चर्चा होत्या. त्यानंतर कोण कुणाला अंगावर घेतं हे तुम्ही बघालच, अशी टीका शिवसेनेचे खासदार अनिल देसाई यांनी राणे यांच्यावर केली आहे. त्यामुळे आता महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये मंत्रिमंडळ विस्तारावरून चांगलेच आरोप प्रत्यारोप होतांना पाहायला मिळत आहे.
Recommendation for You

Post Views : 80 पालघर– मोखाडा तालुक्यातील घाणवळ परिसरातील दोन महिन्यांच्या बालकाचा लसीकरणानंतर मृत्यू झाल्याची…
















zzlWzi8qqy8Un4Ec/s320/1001506655.jpg