सांगली : राज्यातील तीन चाकाच्या महाविकास आघाडी सरकारने राज्याला कोरोनाची राजधानी करून ठेवलंय. असे गंभीर आरोप भाजपचे नेते आशिष शेलार यांनी केले आहे. सांगली दौऱ्यावर असताना शेलार यांनी हा आरोप केलाय. शेलार यांच्या या वक्तव्यावर आता राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
Home
पालघर
महाविकास आघाडी सरकारने राज्याला कोरोनाची राजधानी केलंय, भाजप नेते आशिष शेलार यांचा गंभीर आरोप
महाविकास आघाडी सरकारने राज्याला कोरोनाची राजधानी केलंय, भाजप नेते आशिष शेलार यांचा गंभीर आरोप
‘सध्या सांगली जिल्ह्यामध्ये लसीचा साठा अपुरा आहे. तसेच केंद्राने लसीकरणासाठीची जबाबदारी घेतली पाहिजे आणि मुबलक प्रमाणात लसी उपलब्ध करून दिल्या पाहिजे’, असं म्हणत आशिष शेलार यांनी लसीच्या पुरवठयामध्ये लक्ष घातलं पाहिजे, असा पलटवार जयंत पाटील यांनी केला आहे.
सांगलीमधील बहुतांश नागरिक कोरोना लसीच्या दुसऱ्या डोसच्या प्रतीक्षेत असताना विरोधी पक्षाने केंद्राला सांगून महाराष्ट्रात लसींचा साठा उपलब्ध करून द्यावा, असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, कोरोना लसीच्या पुरवठयासंदर्भात केंद्र सरकार विरुद्ध महाराष्ट्र राज्य सरकार असा वाद निर्माण झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. त्यातच केंद्राने संपूर्ण लसीकरणाची जबाबदारीही घेतली व नागरिकांचं मोफत लसीकरण करण्यात येणार असल्याची घोषणा केली. मात्र यावर आघाडी सरकार लसीकरणावरून केंद्र सरकारवर निशाणा साधत आहे.
Recommendation for You

Post Views : 107 पालघर आगारात प्रवाशांच्या सेवेत पाच नवीन ‘राजमाता जिजाऊ’ बसगाड्यांचा समावेश करण्यात…

पालघर-योगेश चांदेकर पालघर: जव्हार तालुक्यातील धारणहट्टी गावातील दोन आदिवासी अल्पवयीन मुलांना बालकामगार म्हणून वाडा तालुक्यातील…

Post Views : 107 शासनाने जाहीर केलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत…

Post Views : 107 पालघर-योगेश चांदेकर पालघर- आधुनिक पालघरच्या निर्मितीत आणि विकासाच्या प्रक्रियेत राजेंद्र गावित…

पालघर-योगेश चांदेकर पालघर: राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने पालघर जिल्ह्यात मोठी कारवाई करत बनावट…












zzlWzi8qqy8Un4Ec/s320/1001506655.jpg