पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोग अर्थात एमपीएससीची परीक्षा उत्तीर्ण होऊनही नोकरी न मिळाल्याने पुण्यात एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.
Home
पालघर
“मी घाबरलो, खचलो मुळीच नाही.फक्त मी कमी पडलो. माझ्याकडे वेळ नव्हता; पुण्यात 'एमपीएससी' परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
“मी घाबरलो, खचलो मुळीच नाही.फक्त मी कमी पडलो. माझ्याकडे वेळ नव्हता; पुण्यात ‘एमपीएससी’ परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
तरुणाने मृत्यूपूर्वी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीत नोकरी मिळत नसल्यामुळे आत्महत्या करत असल्याचं म्हटले आहे. स्वप्नील सुनील लोणकर (वय 24 रा.गंगानगर, फुरसुंगी) असे आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थ्याचं नाव आहे.
स्वप्नीलची आर्थिक परिस्थिती चांगली नसून, स्वप्निल शिक्षण पूर्ण झाल्यापासून ‘एमपीएससी’च्या परीक्षेची तयारी करत होता. स्वप्नीलचे वडील सुनील लोणकर यांचा शनिवार पेठेत बिल बुक बनविण्याचा छोटा प्रिटींग प्रेसचा व्यवसाय आहे. सुनिल लोणकर आणि त्यांच्या पत्नी असे दोघेजण हा व्यवसाय पाहतात.
आई-वडील नेहमीप्रमाणे बुधवारी सकाळी कामानिमित्त बाहेर पडले. त्यानंतर त्यांची मुलगी दुपारी साडे चार वाजता घरी आली. त्यावेळी स्वप्नीलने त्याच्या खोलीमध्ये गळफास घेतल्याचे तिच्या निदर्शनास आले. या प्रकाराबाबत तिने आई-वडिलांना माहिती दिली. त्यानंतर स्वप्नीलला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषीत केले.
आत्महत्या करण्यापूर्वी स्वप्नीलने सुसाईड नोट लिहिली होती. यामध्ये स्वप्निलने, “मी घाबरलो, खचलो मुळीच नाही.फक्त मी कमी पडलो. माझ्याकडे वेळ नव्हता, एमपीएससी मायाजाल आहे यामध्ये पडू नका असे त्यामध्ये त्याने म्हटले आहे. अधिकारी होण्याची स्वप्ने पाहणाऱ्या या तरुणाच्या आत्महत्येमुळे विद्यार्थी वर्गात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे कुटुंबासह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
Recommendation for You

Post Views : 123 पालघर-योगेश चांदेकर पालघर– शिक्षणाची गंगा केवळ शहरांच्या भिंतींपुरती मर्यादित न राहता…

Post Views : 123 पालघर-योगेश चांदेकर पालघर– वसई तालुक्यातील नामांकित सेवा विवेक संस्थेने आदिवासी महिला…

Post Views : 123 पालघर-योगेश चांदेकर पालघर: ‘रॉयल-सिट्रस कंपनी’तील गुंतवणूकदार सभासद आणि प्रतिनिधींना परतावा मिळवून…

शिरगाव मांगेलआळी परिवाराचा समाजोपयोगी उपक्रम; गणेश विसर्जनासाठी विनामूल्य होडीसेवा व मनुष्यबळ उपलब्ध
Post Views : 123 पालघर : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक बांधिलकी जपत शिरगाव मांगेलआळी परिवारातर्फे गणेशमूर्ती…

Post Views : 123 पालघर-योगेश चांदेकर आसनगावच्या सूर्यवंशी क्षत्रिय कुणबी समाज गणेशोत्सव मंडळाचा देखावा पालघर:…












zzlWzi8qqy8Un4Ec/s320/1001506655.jpg