औरंगाबाद : सलमान शेख – देशात कोरोनाचा प्रादुर्भाव अजूनही सुरूच आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव काहीसा कमी झाला असला तरी, धोका मात्र अद्याप टळलेला नाही. त्यात आता राज्यातील काही जिल्ह्यात कोरोनाचा धोका वाढलेला असल्याने चित्र आहे. त्यातच आता कोरोना नियंत्रणात असलेल्या भागात शाळा पुन्हा सुरू करण्यात येणार असल्याचं शिक्षण विभागाने सांगितलं होतं. आता त्यावर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी गंभीर इशारा दिला आहे.
राज्यातील ‘शाळा’ सुरू करण्याबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे वक्तव्य, म्हणाले…
अजूनही लहान मुलांचे कोरोना प्रतिबंधक लसीकरण झालेले नाही. लहान मुलांना कोरोनाच्या प्रादुर्भावाचा धोका जास्त आहे. त्यामुळे सध्या शाळा सुरू करणं योग्य नाही, अशी प्रतिक्रिया राजेश टोपे यांनी दिली आहे. 18 वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या मुलांचे लसीकरण होत असल्यानं महाविद्यालय सुरू करण्यास हरकत नाही.
राज्यात कोरोनामुक्त झालेल्या विभागातील शाळा पहिल्या टप्या-टप्प्यात सुरु करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे. मागील महिनाभरापासून एकही रुग्ण न आढळलेल्या ठिकाणी 15 जुलैपासून आठवी ते बारावीचे वर्ग सुरू केले जात आहेत. वर्ग सुरू करण्यापुर्वी सर्व शिक्षकांचे लसीकरण पूर्ण करण्यात येणार आहेत. पण लहान मुलांचं लसीकरण झालं नसल्यानं आता लहान मुलांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर येऊ शकतो. असे टोपे म्हणाले.
दरम्यान, जनता त्रस्त आहे त्यामुळे निर्बंध पूर्णतः काढून पूर्ण दिलासा द्यावा. अशी विनंती आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे. कोरोना परिस्थिती गंभीर असलेल्या जिल्ह्यात कडक निर्बंध लागू करावेत, पण कोरोना स्थिती नियंत्रणात असलेल्या जिल्ह्यात निर्बंध पुर्णपणे काढून टाकावेत, असे मुख्यमंत्र्यांना सांगितल्याचे टोपे म्हणाले.
Recommendation for You

Post Views : 106 पालघर-योगेश चांदेकर पालघर– शिक्षणाची गंगा केवळ शहरांच्या भिंतींपुरती मर्यादित न राहता…

Post Views : 106 पालघर-योगेश चांदेकर पालघर– वसई तालुक्यातील नामांकित सेवा विवेक संस्थेने आदिवासी महिला…

Post Views : 106 पालघर-योगेश चांदेकर पालघर: ‘रॉयल-सिट्रस कंपनी’तील गुंतवणूकदार सभासद आणि प्रतिनिधींना परतावा मिळवून…

शिरगाव मांगेलआळी परिवाराचा समाजोपयोगी उपक्रम; गणेश विसर्जनासाठी विनामूल्य होडीसेवा व मनुष्यबळ उपलब्ध
Post Views : 106 पालघर : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक बांधिलकी जपत शिरगाव मांगेलआळी परिवारातर्फे गणेशमूर्ती…

Post Views : 106 पालघर-योगेश चांदेकर आसनगावच्या सूर्यवंशी क्षत्रिय कुणबी समाज गणेशोत्सव मंडळाचा देखावा पालघर:…












zzlWzi8qqy8Un4Ec/s320/1001506655.jpg