मुंबई : विधानसभेचे यंदाचे पावसाळी अधिवेशन येत्या 5 आणि 6 जुलै रोजी होत आहे. कोरोनाच्या संभाव्य तिसरी लाट आणि डेल्टा प्लस विषाणूच्या पार्श्वभूमीवर यंदाचे पावसाळी अधिवेशन दोनच दिवस चालणार आहे. या अधिवेशनात विधानसभा अध्यक्षाची निवडणूक होणार आहे. ही निवडणूक 6 जुलै रोजी होणार असल्याची माहिती समोर आली.
Home
पालघर
विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक; काँग्रेसच्या संग्राम थोपटे यांच्या नावाला राष्ट्रवादीकडून विरोध
विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक; काँग्रेसच्या संग्राम थोपटे यांच्या नावाला राष्ट्रवादीकडून विरोध
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी विधानसभा अध्यक्ष पद हे काँग्रेसलाच येणार असे स्पष्ट केले होते. काँग्रेसकडून संग्राम थोपटे यांचे नाव आघाडीवर आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसकडून संग्राम थोपटे यांच्या नावाला विरोध होत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे उमेदवारी वरून काँग्रेसने सावध पवित्रा घेतला आहे. 4 जुलैला विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीची अधिसूचना जारी करण्यात येणार आहे. तर 5 जुलैला उमेदवारी अर्ज भरणे, अर्जाची छाननी आणि उमेदवारी अर्ज मागे घेण्याची वेळ देण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, मुंबईत होणाऱ्या दोन दिवसांच्या पावसाळी अधिवेशनात नवीन विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक होईल, असे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केले आहे. त्याच वेळी विधानसभा अध्यक्षपद हे काँग्रेसलाच मिळणार असेही त्यांनी स्पष्ट केले. माजी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष पद स्वीकारल्यानंतर 2020च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर अद्यापही अध्यक्षपदाची निवडणूक घेण्यात आलेली नाही.
Recommendation for You

Post Views : 108 पालघर आगारात प्रवाशांच्या सेवेत पाच नवीन ‘राजमाता जिजाऊ’ बसगाड्यांचा समावेश करण्यात…

पालघर-योगेश चांदेकर पालघर: जव्हार तालुक्यातील धारणहट्टी गावातील दोन आदिवासी अल्पवयीन मुलांना बालकामगार म्हणून वाडा तालुक्यातील…

Post Views : 108 शासनाने जाहीर केलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत…

Post Views : 108 पालघर-योगेश चांदेकर पालघर- आधुनिक पालघरच्या निर्मितीत आणि विकासाच्या प्रक्रियेत राजेंद्र गावित…

पालघर-योगेश चांदेकर पालघर: राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने पालघर जिल्ह्यात मोठी कारवाई करत बनावट…












zzlWzi8qqy8Un4Ec/s320/1001506655.jpg