नवी दिल्ली : देशात कोरोनाचा वेग मंदावला आहे. ही एक दिलासादायक बाब म्हणावी लागेल. देशात बुधवारी 48 हजार 415 नवीन रुग्ण आढळून आले. तर 61 हजार 494 जण कोरोनातून बरे झाले. तर 988 जणांचा गेल्या 24 तासांत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा हा 3.4 कोटी इतका झाला आहे. सध्या देशातील विविध भागात 5.17 लाख रुग्णांवर उपचार सुरु असून, आतापर्यंत कोरोनामुळे उपचारादरम्यान 3.99 लाख जणांचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर दिलासादायक म्हणजे आतापर्यंत 2.94 कोटी जणांनी कोरोनावर मात केली असून, त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.
Corona In India : देशात गेल्या 24 तासात 48,415 जणांना कोरोनाची लागण
दरम्यान, देशात कोरोनाची तिसरी संभाव्य लाट आणि डेल्टा प्लस विषाणूच्या पार्श्वभूमीवर अनेक राज्यात पुन्हा कडक निर्बंध लावण्यात आले आहे. महाराष्ट्रातही पुन्हा एकदा कडक निर्बंध लागू करण्यात आले असून, सकाळी 7 ते दुपारी 4 वाजेपर्यंतच व्यवहार सुरू असणार आहे.
Recommendation for You

Post Views : 104 पालघर-योगेश चांदेकर पालघर– शिक्षणाची गंगा केवळ शहरांच्या भिंतींपुरती मर्यादित न राहता…

Post Views : 104 पालघर-योगेश चांदेकर पालघर– वसई तालुक्यातील नामांकित सेवा विवेक संस्थेने आदिवासी महिला…

Post Views : 104 पालघर-योगेश चांदेकर पालघर: ‘रॉयल-सिट्रस कंपनी’तील गुंतवणूकदार सभासद आणि प्रतिनिधींना परतावा मिळवून…

शिरगाव मांगेलआळी परिवाराचा समाजोपयोगी उपक्रम; गणेश विसर्जनासाठी विनामूल्य होडीसेवा व मनुष्यबळ उपलब्ध
Post Views : 104 पालघर : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक बांधिलकी जपत शिरगाव मांगेलआळी परिवारातर्फे गणेशमूर्ती…

Post Views : 104 पालघर-योगेश चांदेकर आसनगावच्या सूर्यवंशी क्षत्रिय कुणबी समाज गणेशोत्सव मंडळाचा देखावा पालघर:…












zzlWzi8qqy8Un4Ec/s320/1001506655.jpg