नवी दिल्ली : देशात कोरोनाचा वेग मंदावला आहे. ही एक दिलासादायक बाब म्हणावी लागेल. देशात बुधवारी 48 हजार 415 नवीन रुग्ण आढळून आले. तर 61 हजार 494 जण कोरोनातून बरे झाले. तर 988 जणांचा गेल्या 24 तासांत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा हा 3.4 कोटी इतका झाला आहे. सध्या देशातील विविध भागात 5.17 लाख रुग्णांवर उपचार सुरु असून, आतापर्यंत कोरोनामुळे उपचारादरम्यान 3.99 लाख जणांचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर दिलासादायक म्हणजे आतापर्यंत 2.94 कोटी जणांनी कोरोनावर मात केली असून, त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.
Corona In India : देशात गेल्या 24 तासात 48,415 जणांना कोरोनाची लागण
दरम्यान, देशात कोरोनाची तिसरी संभाव्य लाट आणि डेल्टा प्लस विषाणूच्या पार्श्वभूमीवर अनेक राज्यात पुन्हा कडक निर्बंध लावण्यात आले आहे. महाराष्ट्रातही पुन्हा एकदा कडक निर्बंध लागू करण्यात आले असून, सकाळी 7 ते दुपारी 4 वाजेपर्यंतच व्यवहार सुरू असणार आहे.
Recommendation for You

Post Views : 94 पालघर आगारात प्रवाशांच्या सेवेत पाच नवीन ‘राजमाता जिजाऊ’ बसगाड्यांचा समावेश करण्यात…

पालघर-योगेश चांदेकर पालघर: जव्हार तालुक्यातील धारणहट्टी गावातील दोन आदिवासी अल्पवयीन मुलांना बालकामगार म्हणून वाडा तालुक्यातील…

Post Views : 94 शासनाने जाहीर केलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत…

Post Views : 94 पालघर-योगेश चांदेकर पालघर- आधुनिक पालघरच्या निर्मितीत आणि विकासाच्या प्रक्रियेत राजेंद्र गावित…

पालघर-योगेश चांदेकर पालघर: राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने पालघर जिल्ह्यात मोठी कारवाई करत बनावट…












zzlWzi8qqy8Un4Ec/s320/1001506655.jpg