औरंगाबाद : सलमान शेख – कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर आणि कमी प्रवास संख्या यामुळे इंडिगोने औरंगाबादहून सुरू असलेली सर्व विमाने रद्द केली होती. मात्र आता कोरोनाचा प्रकोप ओसरल्याने अखेर इंडिगोने विमानसेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. दिनांक 5 जुलैपासून दिल्ली ते हैदराबाद विमानसेवा पुन्हा एकदा सुरू करण्याचा निर्णय इंडिगोने घेतला आहे. त्यामुळे बंद झालेली हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा एकदा सुरू होणार आहे. औरंगाबाद-दिल्ली विमानसेवा आठवड्यातून तीन दिवस तर औरंगाबाद-हैदराबाद विमानसेवा आठवड्यातून चार दिवस चालणार आहे. सध्या शहरात एअर इंडियाची विमानसेवा सुरू असून, मुंबई आणि दिल्ली प्रवास विमानसेवा उपलब्ध आहे. इंडिगोकडून लवकरच औरंगाबाद- बंगळुरु आणि अहमदाबाद ही विमानसेवा सुरू होणार आहे. दरम्यान, कोरोनाचा वाढत असलेला प्रादुर्भाव आणि लागू करण्यात आलेला लॉकडाऊन यामुळे इंडिगोने आपली सेवा बंद केली होती. मात्र आता औरंगाबादकरांना इंडिगोच्या विमानसेवेचा लाभ मिळणार आहे.
इंडिगोचे दिल्ली, हैदराबाद विमान 5 जुलैपासून पुन्हा घेणार औरंगाबादेत ‘उड्डाण’
Recommendation for You

Post Views : 109 पालघर आगारात प्रवाशांच्या सेवेत पाच नवीन ‘राजमाता जिजाऊ’ बसगाड्यांचा समावेश करण्यात…

पालघर-योगेश चांदेकर पालघर: जव्हार तालुक्यातील धारणहट्टी गावातील दोन आदिवासी अल्पवयीन मुलांना बालकामगार म्हणून वाडा तालुक्यातील…

Post Views : 109 शासनाने जाहीर केलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत…

Post Views : 109 पालघर-योगेश चांदेकर पालघर- आधुनिक पालघरच्या निर्मितीत आणि विकासाच्या प्रक्रियेत राजेंद्र गावित…

पालघर-योगेश चांदेकर पालघर: राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने पालघर जिल्ह्यात मोठी कारवाई करत बनावट…












zzlWzi8qqy8Un4Ec/s320/1001506655.jpg