नवी दिल्ली : सीबीएसई बोर्डाने 12 वीच्या निकालाची पद्धत गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात सादर केली आहे. बोर्डाने बारावीचा निकाल 31 जुलै रोजी जाहीर करण्यात येईल असे न्यायालयात म्हटले आहे. दहावी, अकरावी आणि बारावी या तिन्ही इयत्तेचा विचार करता 30:30:40 ही प्रणाली वापरून गुण देण्यात येणार आहे. दहावी आणि अकरावी या इयत्तेत सर्वाधिक गुण असलेल्या 5 विषयांपैकी 3 विषयाचे गुण आधारभूत केले जाणार आहे. त्यानंतर 12 वी इयत्तेतील चाचणी परीक्षा, सत्र परीक्षा, प्रॅक्टिकल यामध्ये मिळालेल्या गुणांचा विचार करून 12 वी चा निकाल जाहीर करण्यात येणार आहे. दहावी आणि अकरावीच्या गुणांचा प्रत्येकी 30 टक्के आणि 12 वीच्या गुणांचा 40 टक्के याप्रमाणे मूल्यांकन केले जाणार आहे. आणि निकाल 31 जुलै रोजी घोषित करण्यात येणार आहे.
सीबीएसई बोर्डाचा ’12 वी’चा निकाल 31 जुलैला जाहीर होणार
दरम्यान, देशात कोरोनाचा शिरकाव झाल्यापासून शिक्षण प्रणाली ऑनलाइन पद्धतीने सुरू आहे. वाढती रुग्णसंख्या विचारात घेता यंदा दहावी आणि बारावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला होता. त्यामुळे आता 10 आणि 11 च्या गुणांवर 12 वीचे गुण मिळणार आहे.
Recommendation for You

Post Views : 110 पालघर-योगेश चांदेकर पालघर– शिक्षणाची गंगा केवळ शहरांच्या भिंतींपुरती मर्यादित न राहता…

Post Views : 110 पालघर-योगेश चांदेकर पालघर– वसई तालुक्यातील नामांकित सेवा विवेक संस्थेने आदिवासी महिला…

Post Views : 110 पालघर-योगेश चांदेकर पालघर: ‘रॉयल-सिट्रस कंपनी’तील गुंतवणूकदार सभासद आणि प्रतिनिधींना परतावा मिळवून…

शिरगाव मांगेलआळी परिवाराचा समाजोपयोगी उपक्रम; गणेश विसर्जनासाठी विनामूल्य होडीसेवा व मनुष्यबळ उपलब्ध
Post Views : 110 पालघर : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक बांधिलकी जपत शिरगाव मांगेलआळी परिवारातर्फे गणेशमूर्ती…

Post Views : 110 पालघर-योगेश चांदेकर आसनगावच्या सूर्यवंशी क्षत्रिय कुणबी समाज गणेशोत्सव मंडळाचा देखावा पालघर:…












zzlWzi8qqy8Un4Ec/s320/1001506655.jpg