banner 728x90

उत्कर्षने बनवला नोकरी अॅप

banner 468x60

Share This:

तिसगाव : प्रतिनिधी आपण समाजाचे काही देणे लागतो. एवढ्याच एका छोट्याशा उद्देशाने या प्रतिष्ठाणची स्थापना करण्यात आली .ग्रामीण भागात असणारा विद्यार्थी आज कोणत्याही समस्येला तोंड देऊ शकतो. उत्कर्ष प्रतिष्ठाणचे संस्थापक अध्यक्ष सचिन लवांडे यांच्या संकल्पनेतून सहकाऱ्यांनी मिळून 2012 साली उत्कर्ष प्रतिष्ठाणची स्थापना केली. आपण ज्या शाळेमध्ये शिकलो त्या शाळेपासूनच उत्कर्ष प्रतिष्ठाणच्या विविध उपक्रमांची सुरुवात करण्यात आली.आपण ज्या शाळेच्या प्रांगणामध्ये खेळलो बागडलो आणि आज आपल्या स्वतःच्या पायावर उभे राहिलो. त्याच शाळेच्या व्यासपीठावरून विद्यार्थ्यांना शालेय साहित्य त्याचबरोबर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन पुस्तके देत असताना मनस्वी आनंद होत होता. दरवर्षी जून महिन्यामध्ये शालेय साहित्य वाटपाचे काम आजतागायत अव्याहतपणे चालू आहे.ग्रामीण भागातील होतकरू विद्यार्थ्याना दरवर्षी शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीस वह्यांचे वाटप,लेखन साहित्य, त्याचबरोबर प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी , तसेच वृक्षलागवड, वृक्षसंवर्धन यासारखे अनेक उपक्रम प्रतिष्ठाणने हाती घेत समाजात एक आदर्श उभा केला आहे. पर्यावरण समस्या यांचे जागतिक समस्या म्हणून भेडसावत आहे या समस्येला तोंड देण्यासाठी झाडे लावणे आणि ती जगविणे हाच एकमेव उपाय आहे हाच धागा पकडून प्रतिष्ठाणच्या वतीने तिसगाव येथील वनपरिक्षेत्र मध्ये जवळपास 200 झाडांची लागवड दरवर्षी करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. कोरोना काळात परप्रांतीय मजूरांची भासणारी कमतरता आणि कुशल कामगारांचा येणाऱ्या काळात निश्चित तुटवडा भासणार आहे. रोजगाराच्या या संधीचा फायदा करून घेऊन स्थानिकांना राेजगार उपलब्ध करून देण्यात मानस उत्कर्ष प्रतिष्ठाणचा आहे. एकालिंक वरून आपण आपल्या रोजगाराची संधी निश्चित करू शकतो. त्यासाठी उत्कर्ष प्रतिष्ठाण व फाेरकन्स्टो इनकाॅरपाेरॅषन व गार्गी सोलर सिस्टम यांचे संयुक्त विद्यमाने “” राेजगार संधी”” हे अॅप तयार केले आहे. त्याची लिंक खालीलप्रमाणे त्याचे लाॅंचिंग आज मा. नामदार श्री. प्राजक्त दादा तनपुरे राज्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी प्रतिष्ठाण अध्यक्ष श्री. सचिन लवांडे, प्रतिष्ठाण सदस्य श्री. हर्षद शिंदे, नितिन लवांडे, मयूर राहिंज, कल्याण लवांडे आदी उपस्थित होते. उत्कर्ष प्रतिष्ठानने (तिसगाव)आपण समाजाचे काही देणे लागतो. एवढ्याच एका छोट्याशा उद्देशाने या प्रतिष्ठाणची स्थापना करण्यात आली .ग्रामीण भागात असणारा विद्यार्थी आज कोणत्याही समस्येला तोंड देऊ शकतो. उत्कर्ष प्रतिष्ठाणचे संस्थापक अध्यक्ष सचिन लवांडे यांच्या संकल्पनेतून सहकाऱ्यांनी मिळून 2012 साली उत्कर्ष प्रतिष्ठाणची स्थापना केली. आपण ज्या शाळेमध्ये शिकलो त्या शाळेपासूनच उत्कर्ष प्रतिष्ठाणच्या विविध उपक्रमांची सुरुवात करण्यात आली.आपण ज्या शाळेच्या प्रांगणामध्ये खेळलो बागडलो आणि आज आपल्या स्वतःच्या पायावर उभे राहिलो. त्याच शाळेच्या व्यासपीठावरून विद्यार्थ्यांना शालेय साहित्य त्याचबरोबर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन पुस्तके देत असताना मनस्वी आनंद होत होता. दरवर्षी जून महिन्यामध्ये शालेय साहित्य वाटपाचे काम आजतागायत अव्याहतपणे चालू आहे.ग्रामीण भागातील होतकरू विद्यार्थ्याना दरवर्षी शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीस वह्यांचे वाटप,लेखन साहित्य, त्याचबरोबर प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी , तसेच वृक्षलागवड, वृक्षसंवर्धन यासारखे अनेक उपक्रम प्रतिष्ठाणने हाती घेत समाजात एक आदर्श उभा केला आहे. पर्यावरण समस्या यांचे जागतिक समस्या म्हणून भेडसावत आहे या समस्येला तोंड देण्यासाठी झाडे लावणे आणि ती जगविणे हाच एकमेव उपाय आहे हाच धागा पकडून प्रतिष्ठाणच्या वतीने तिसगाव येथील वनपरिक्षेत्र मध्ये जवळपास 200 झाडांची लागवड दरवर्षी करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. कोरोना काळात परप्रांतीय मजूरांची भासणारी कमतरता आणि कुशल कामगारांचा येणाऱ्या काळात निश्चित तुटवडा भासणार आहे. रोजगाराच्या या संधीचा फायदा करून घेऊन स्थानिकांना राेजगार उपलब्ध करून देण्यात मानस उत्कर्ष प्रतिष्ठाणचा आहे. एकालिंक वरून आपण आपल्या रोजगाराची संधी निश्चित करू शकतो. त्यासाठी उत्कर्ष प्रतिष्ठाण व फाेरकन्स्टो इनकाॅरपाेरॅषन व गार्गी सोलर सिस्टम यांचे संयुक्त विद्यमाने “” राेजगार संधी”” हे अॅप तयार केले आहे. त्याची लिंक खालीलप्रमाणे त्याचे लाॅंचिंग आज मा. नामदार श्री. प्राजक्त दादा तनपुरे राज्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी प्रतिष्ठाण अध्यक्ष श्री. सचिन लवांडे, प्रतिष्ठाण सदस्य श्री. हर्षद शिंदे, नितिन लवांडे, मयूर राहिंज, कल्याण लवांडे आदी उपस्थित होते.

banner 468x60

banner 468x60

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!