मुंबई : राज्यात कोरोनाचा वेग काही प्रमाणात मंदावला आहे. ही एक दिलासादायक बाब म्हणावी लागेल. राज्यात आज रूग्णांच्या संख्येत लक्षणीय घट झाल्याचं चित्र समोर आलं आहे. वाढत्या कोरोना रूग्णांच्या पार्श्वभूमीवर राज्यात पुन्हा एकदा लाॅकडाऊन घोषित करण्यात आला होता. त्याचा सकारात्मक परिणाम राज्यात होतांना पाहायला मिळत आहे.
दिलासादायक! राज्यात कोरोनाचा वेग मंदावला, गेल्या 24 तासात रुग्णसंख्येत लक्षणीय घट
राज्यात गेल्या 24 तासात 07 हजार 603 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर 15 हजार 277 रुग्ण कोरोनामुक्त होऊन आपल्या घरी परतले आहेत. याशिवाय राज्यात दिवसभरात 53 रूग्णांचा मृत्यू झाला आहे.
राज्याचा रिकव्हरी रेट हा 96.15 टक्के इतका असून, आतापर्यंत 59 लाख 27 हजार 756 जणांनी कोरोनावर मात केली असून, त्यांना सुखरूप घरी सोडण्यात आले आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 2.04 टक्के एवढा आहे.
दरम्यान, राज्यात कोरोनाची दुसरी लाट आल्याने तसेच मुंबईतील वाढता कोरोनाचा प्रादुर्भाव या पार्श्वभूमीवर मुंबईतील लोकल रेल्वे सर्वसामान्य जनतेसाठी बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. मात्र आता कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात कमी झाला असून, मुंबई लोकल आता पुन्हा कधी सुरू होणार? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिक विचारत आहे. याबाबत विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी मोठं स्पष्टीकरण दिलं आहे.
Recommendation for You

Post Views : 103 पालघर आगारात प्रवाशांच्या सेवेत पाच नवीन ‘राजमाता जिजाऊ’ बसगाड्यांचा समावेश करण्यात…

पालघर-योगेश चांदेकर पालघर: जव्हार तालुक्यातील धारणहट्टी गावातील दोन आदिवासी अल्पवयीन मुलांना बालकामगार म्हणून वाडा तालुक्यातील…

Post Views : 103 शासनाने जाहीर केलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत…

Post Views : 103 पालघर-योगेश चांदेकर पालघर- आधुनिक पालघरच्या निर्मितीत आणि विकासाच्या प्रक्रियेत राजेंद्र गावित…

पालघर-योगेश चांदेकर पालघर: राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने पालघर जिल्ह्यात मोठी कारवाई करत बनावट…












zzlWzi8qqy8Un4Ec/s320/1001506655.jpg