banner 728x90

लाडकी बहीण योजनेला अजित पवारांच्या नावावर करण्याची मागणीवर देवेंद्र फडणवीसांनी केले हे विधान

banner 468x60

Share This:

राज्यातील दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवारांचे 28 जानेवारी 2026 रोजी बारामतीत विमान अपघातात दुर्देवी निधन झाले. त्यांच्या निधन पश्चात लाडकी बहीण योजनेला अजित पवारांचे नाव द्यावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी केली असून या योजनेचे नाव अजित दादांची लाडकी बहीण योजना असे नाव करून त्यांच्या स्मृतींना जपावे अशी मागणी केली आहे.

या मागणी नंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी हे महत्त्वाचे विधान केले आहे. ते म्हणाले, लाडकी बहीण योजनेबाबत अनेक मागण्या आहे. या वर बसून योग्य निर्णय घेऊ. अजित पवार यांच्या अर्थखात्याच्या नियोजनामुळे योजनेवर कोणताही संकट येणार नाही, असे सांगितले जाते. अशातच आता अमोल मिटकरींनी या योजनेला अजित पवार यांचे नाव देण्याची मागणी केली आहे, आणि या मागणीवर सरकारकडून निर्णयाची वाट पाहिली जात आहे.

या योजनेत सध्या ई केवायसी प्रक्रियामध्ये काही तांत्रिक अडचणी येत आहे. त्यापूर्वी या योजनेवर आर्थिक अडचणीमुळे योजना बंद होण्याचे विरोधकांकडून म्हटले जात होते. मात्र महायुती सरकार ने योजना बंद होणार नाही आणि लाभार्थी महिलांना दरमहा आर्थिक मदत मिळत राहील असे स्पष्टीकरण देत विरोधकांचे तोंड बंद केले.

banner 468x60

banner 468x60

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!