राज्यात उष्णतेच्या लाटेची अधिक शक्यता वर्तवण्यात आली आहे. अवकाळी पावसाचा धोका संपला असून 28 एप्रिल रोजी उष्णतेची तीव्रता अधिक होणार आहे. हवामान विभागाने 8 जिल्ह्यांना उष्णतेचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे, तसेच 5 जिल्ह्यांसाठी पावसाचा यलो अलर्ट जारी केला.
अशातच नागरिकांना सतर्कतेचा हवामान विभागाचा इशारा आहे.
कोकण
कोकण विभागातील ठाणे जिल्ह्यात उष्णतेचा यलो अलर्ट जारी करण्यात आला. तसेच काही ठिकाणी उकाडा वाढण्याची संभावना आहे. आर्द्रतेमुळे उष्णतेचा त्रास अधिक जाणवू लागले आहे. नागरिकांनी दुपारी बाहेर पडताना दक्षता घ्यावी.
पश्चिम महाराष्ट्र
पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर या जिल्ह्यात हवामान हे पूर्णपणे उष्ण आणि कोरडं राहण्याची शक्यता आहे. या जिल्ह्यांना उन्हाचा अधिक चटका सोसावा लागणार आहे. अशातच नागरिकांनी दुपारी घराबाहेर पडणे शक्यतो टाळावे.
मराठवाडा
मराठवाडा विभागातील छत्रपती संभाजीनगर, परभणी, हिंगोली, जालना आणि नांदेड या जिल्ह्यात उष्णतेचा यलो अलर्ट जारी केला. तसेच या जिल्ह्यातील हवामान हे उष्ण आणि कोरडं राहण्याची शक्यता आहे. अधिक उन्हाच्या चटक्यामुळे नागरिकांच्या जनजीवनावर मोठा परिणाम होत आहे.
उत्तर महाराष्ट्र
उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, जळगाव आणि नंदुरबार या जिल्ह्यांत हवामान उष्ण आणि कोरडं राहण्याची शक्यता आहे.
विदर्भ
पूर्व विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर आणि वर्धा या जिल्ह्यांमध्ये पावसाचा अलर्ट जारी केला. पश्चिम विदर्भ विभागात अकोला, अमरावती आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये मिश्र हवामानाची स्थिती असेल.


















zzlWzi8qqy8Un4Ec/s320/1001506655.jpg