banner 728x90

ओबीसींनो आतातरी जागे व्हा, सरकारच्या आरक्षणाच्या निर्णयानंतर विजय वडेट्टीवार संतापले

banner 468x60

Share This:

महाराष्ट्र सरकारने नोकरभरतीमध्ये राखीव वर्गातील तरुणांनी फीची सवलत वगळता इतर सवलत घेतली असल्यास खुल्या प्रवर्गातून दावा करण्यात येणार नसल्याचे निर्णय घेतला आहे.

राज्य सरकारच्या या निर्णयामुळे काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी संताप व्यक्त केला आहे.

एक्सवर पोस्ट करत ते म्हटले आहेत की, ‘मतं बहुजनांची, पण निर्णय मात्र त्यांच्याच विरोधात! राखीव प्रवर्गातील तरुणांना खुल्या प्रवर्गाच्या गुणवत्तेतून बाहेर काढण्याचा कट महायुती सरकारने केला आहे. यासाठी मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय झाला. हीच का तुमची बहुजन हिताची धोरणं? हा निर्णय म्हणजे आरक्षण विरोधी मानसिकतेचे जिवंत उदाहरण आहे.’

banner 325x300

‘निवडणुका आल्या की ओबीसी, मागासवर्गीय समाजाची आठवण येते, ओबीसी आमचा DNA आहे असं म्हणणारे मुख्यमंत्री सत्तेत आले की ओबीसींच्या हक्कांना नख लावण्याचं काम पद्धतशीरपणे करतात. हा विश्वासघात आहे.’, अशी टीका त्यांनी केली आहे.

‘मनुवादी मानसिकतेच्या पक्षांना मागासवर्गीय समाज फक्त ‘व्होट बँक’ म्हणून हवा असतो. निर्णय प्रक्रियेत आणि हक्कांच्या वाट्यात मात्र त्यांना नेहमीच बाजूला सारलं जातं. पडद्यामागून आरक्षण विरोधी धोरणं राबवून बहुजनांचं अस्तित्व संपवण्याचा हा एक आत्मघातकी डाव खेळला जात आहे.’, असा आरोपही त्यांनी केला आहे.

आता तरी जागे व्हा…

विजय वडेट्टीवर यांनी सरकारव टीक करताना ओबीसींनो आतातरी जागे व्हा, असे आवाहन देखील केली आहे. मुळात सरकार आरक्षित जागांचा बॅकलाॅग भरत नसताना असा निर्णय घेते आहे तो विद्यार्थ्यांवर अन्यायकारक आहे, अशी टीका देखील सरकारवर करण्यात येत आहे.

banner 468x60

banner 468x60

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!