सुक्या बरोबर ओले जळते असे म्हणतात. त्याचा प्रत्यय शुक्रवारी देशातील प्रवाशांना आला. तो कसा ते वाचा. राज्यात मोठ्या प्रमाणात वाढलेल्या बेकायदेशीर, बोगस मोबाईल टॅक्सी बाईक ॲप गुगलवरून हटवण्याची सूचना राज्याच्या परिवहन विभागाने काही दिवसांपूर्वी केली होती.
त्याची अंमलबजावणी करताना राज्याच्या सायबर गुन्हे विभागाने हे मोबाईल ॲप हटवण्याचे आदेश गुगल आणि ॲपल कंपन्यांना दिले. त्यामुळे शुक्रवारी रात्री प्रवाशांची चांगलीच पंचाईत झाली. अखेर राज्याच्या मुख्यमंत्री कार्यालयाला संपर्क साधल्यानंतर ही समस्या सुटल्याचे समजते.
देशात खूप मोठ्या प्रमाणात बोगस आणि बेकायदेशीर ॲप तयार झाले आहेत. त्यात लोकांचे मोठे नुकसान होत असून जनता या ट्रॅपमध्येही अडकत आहे. मोबाईल ॲप जणुकाही शाप झाले आहेत. अशाच प्रकारचे ॲप दैनंदिन प्रवाशाशी निगडित असलेले ओला उबर रॅपिडो यांनी तयार केले. या कंपन्यांचे बेकायदेशीर ॲप काही आयटी टोळक्यांनी तयार केले आहेत. त्यामुळे सत्य कंपनी आणि प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत अनेक तक्रारी परिवहन विभागाकडे प्राप्त झाल्याने परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी काही दिवसापूर्वी मोबाईल ॲपवर असणारे हे बोगस ॲप हटवण्याची सूचना राज्याच्या पोलिस महासंचालकांना केली होती. महासंचालकांनीही परिवहन विभागाकडून आलेले हे पत्र आणि परिवहन कायद्याचा अभ्यास करून सायबर विभागाला अशा प्रकारचे बेकायदेशीर ॲप हटवण्याचा आदेश दिले. शुक्रवारी रात्री सायबर सेलने ही कारवाई केली. रात्री ही कारवाई केल्याने फार गोंधळ झाला नाही मात्र एक वेगळाच तिढा निर्माण झाला.
सुक्या बरोबर ओलं जळतं असे म्हणतात. त्याचा प्रत्यय आला. सायबर विभागाने बेकायदेशीर ॲप हटवताना खरे सत्य ॲप हटवले. त्यामुळे खऱ्या कंपन्यांची मात्र पंचाईत झाली. या ॲपद्वारे केवळ प्रवास सुविधा नाही तरी इतर सुविधाही दिल्या जातात. बोगस बेकायदेशीर ॲप हटवण्याचा प्रयत्नात काही काळ खरे मोबाईल ॲप मोबाईलवरून गायब झाले. शुक्रवारी रात्रीची वेळ असल्याने फारसा गोंधळ झाला नाही. ओला उबर रॅपिडो कंपन्यांनी तात्काळ राज्याच्या मुख्यमंत्री कार्यालयाला संपर्क साधून ही गफलत लक्षात आणून दिली. त्यामुळे थोड्या वेळातच हे ॲप पूर्ववत करण्यात आले आणि निर्माण झालेला तिढा सोडवण्यात आल्याचे समजते.


















zzlWzi8qqy8Un4Ec/s320/1001506655.jpg