मुंबई : यंदाच्या पावसाळी अधिवेशनात 12 आमदारांना निलंबित केल्यामुळे सत्ताधारी आणि भाजपमध्ये चांगलीच जुंपली होती. त्याच्या निषेधार्थ आमदार मंगलप्रभात लोढा यांच्या नेतृत्वाखाली आज भाजपकडून शिवाजी पार्क परिसरात आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा भाजप कार्यकर्ते दादरच्या शिवसेना भवन परिसरात दाखल होण्याची दाट शक्यता आहे. यामुळे मोठ्या संख्येने शिवसैनिक शिवसेना भवन परिसरात बंदोबस्ताला लागले आहेत.
12 आमदार निलंबनाच्या निषेधार्थ मुंबईत आज भाजपचे आंदोलन; सेनाभवनाला शिवसैनिकांचा पहारा
यावर प्रतिक्रिया देताना खासदार राहुल शेवाळे म्हणाले, मागचा मारहाणीचा प्रकार घडल्यानंतर त्यांना आम्ही अद्दल घडवली होती. भाजपने त्यातून शिकायला हवे होते. पण दुर्दैवाने भाजप ही जुनी भाजप राहिलेली नाही. भाजपने काही नवीन लोकांना पक्षात घेतल्याने त्यांना शिवसेना भवनाचे महत्त्व माहिती नाही. जुन्या लोकांना त्याचे महत्त्व माहिती होते. शिवसेना भवन पवित्र वास्तू आहे. या पवित्र वास्तूमुळे भाजपही महाराष्ट्रात मोठी झाली आहे. त्यामुळे अशा ठिकाणी मोर्चा काढणे चुकीचे आहे, अशी प्रतिक्रिया शेवाळे यांनी दिली.
Recommendation for You

Post Views : 102 पालघर-योगेश चांदेकर पालघर– शिक्षणाची गंगा केवळ शहरांच्या भिंतींपुरती मर्यादित न राहता…

Post Views : 102 पालघर-योगेश चांदेकर पालघर– वसई तालुक्यातील नामांकित सेवा विवेक संस्थेने आदिवासी महिला…

Post Views : 102 पालघर-योगेश चांदेकर पालघर: ‘रॉयल-सिट्रस कंपनी’तील गुंतवणूकदार सभासद आणि प्रतिनिधींना परतावा मिळवून…

शिरगाव मांगेलआळी परिवाराचा समाजोपयोगी उपक्रम; गणेश विसर्जनासाठी विनामूल्य होडीसेवा व मनुष्यबळ उपलब्ध
Post Views : 102 पालघर : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक बांधिलकी जपत शिरगाव मांगेलआळी परिवारातर्फे गणेशमूर्ती…

Post Views : 102 पालघर-योगेश चांदेकर आसनगावच्या सूर्यवंशी क्षत्रिय कुणबी समाज गणेशोत्सव मंडळाचा देखावा पालघर:…












zzlWzi8qqy8Un4Ec/s320/1001506655.jpg