मुुंबई : बीड पॅटर्नमुळे शेतकऱ्यांचं नव्हे तर, राज्य सरकारचं चांगभलं होणार आहे. असा आरोप विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केला आहे. विधानपरिषदेत सादर केलेल्या पुरवणी मागण्यांवरील चर्चेवर बोलताना प्रविण दरेकर यांनी पीक विम्यासाठी वापरल्या जाणाऱ्या बीड पॅटर्नचा विरोध केला.
Home
पालघर
पीक विम्याच्या बीड पॅटर्नमुळे शेतकऱ्यांचं नव्हे तर, राज्य सरकारचा फायदा - विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर
पीक विम्याच्या बीड पॅटर्नमुळे शेतकऱ्यांचं नव्हे तर, राज्य सरकारचा फायदा – विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर
बीड पॅटर्नच्या माध्यमातून शेतकऱ्यांना फक्त 13 कोटी 42 लाख रुपये मिळाले असताना, राज्य शासनाला यामध्ये 626 कोटी रुपये मिळणार आहेत. म्हणजेच बीड पॅटर्नमुळे राज्य सरकारचं चांगभलं होणार आहे. जे लाखो शेतकरी क्लेम सादर करू शकले नाहीत, त्यांना कोणत्याही प्रकारचा फायदा होणार नाही.
पीक विमा योजनेमध्ये या सरकारच्या काळात 138 लाख शेकऱ्यांचा पीक विमा काढण्यात आला होता. त्यापैकी 15 लाख शेतकऱ्यांना परतावा दिला गेला. जेवढी रक्कम कंपन्यांकडे जमा झाली त्यापैकी फक्त 18 टक्के रक्कम शेतकऱ्यांना मिळाली. या सरकारच्या कृपेमुळे शेतकऱ्यांचा फायदा होण्याऐवजी कंपन्यांना 4234 कोटी रुपयांचा फायदा झाला, असं म्हणत प्रविण दरेकरांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला.
दरम्यान, शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने मोठ्या प्रमाणात घोषणा केल्या. पण अद्याप कोरडवाहू आणि बागायती शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारे मदत मिळाली नाही. असा आरोप दरेकर यांनी केला.
Recommendation for You

Post Views : 151 पालघर-योगेश चांदेकर पालघर– शिक्षणाची गंगा केवळ शहरांच्या भिंतींपुरती मर्यादित न राहता…

Post Views : 151 पालघर-योगेश चांदेकर पालघर– वसई तालुक्यातील नामांकित सेवा विवेक संस्थेने आदिवासी महिला…

Post Views : 151 पालघर-योगेश चांदेकर पालघर: ‘रॉयल-सिट्रस कंपनी’तील गुंतवणूकदार सभासद आणि प्रतिनिधींना परतावा मिळवून…

शिरगाव मांगेलआळी परिवाराचा समाजोपयोगी उपक्रम; गणेश विसर्जनासाठी विनामूल्य होडीसेवा व मनुष्यबळ उपलब्ध
Post Views : 151 पालघर : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक बांधिलकी जपत शिरगाव मांगेलआळी परिवारातर्फे गणेशमूर्ती…

Post Views : 151 पालघर-योगेश चांदेकर आसनगावच्या सूर्यवंशी क्षत्रिय कुणबी समाज गणेशोत्सव मंडळाचा देखावा पालघर:…












zzlWzi8qqy8Un4Ec/s320/1001506655.jpg