banner 728x90

धक्कादायक : डहाणूत ‘लव्ह जिहाद’चा प्रकार ; एका तरुणांकडून दोन संख्या बहिणींवर अत्याचार

banner 468x60

Share This:

पालघर-योगेश चांदेकर


आमदार चित्रा वाघ यांची पोलिस ठाण्याला भेट
मुलींना गुंगीचे औषध देऊन अत्याचाराची अन्य प्रकरणेही उघड

banner 325x300

पालघरः पालघर जिल्ह्यातील डहाणू येथे कथित ‘लव्ह जिहाद’चे प्रकरण उघड झाले आहे. भाजपच्या महिला मोर्चाच्या अध्यक्ष, आमदार चित्रा वाघ यांनी डहाणू पोलिस ठाण्यात भेट देऊन या प्रकरणी संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. एका तरुणाने दोन सख्ख्या बहिणींवर अत्याचार करून त्याचे व्हिडीओ काढले आणि त्याचा गैरफायदा घेत वारंवार अत्याचार करीत राहिल्याचे हे प्रकरण आता चांगलेच पेटले आहे.

याबाबत डहाणू पोलिसांनी गेल्या एक तारखेला फिर्याद दाखल केली आहे. या घटनेची माहिती मिळताच आ. वाघ यांनी डहाणू पोलिस ठाण्यात भेट देऊन तपासाची माहिती घेतली तसेच संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. याबाबतच्या माहितीनुसार एका तरुणाने मोठ्या बहिणीसोबत प्रेम संबंध निर्माण केले. तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्याचे अश्लील व्हिडीओ तयार केले आणि या व्हिडीओचा गैरवापर करून तिला वारंवार ब्लॅकमेल केले.

अल्पवयीन बहिणीवरही अत्याचार
या तरुणीच्या अल्पवयीन लहान बहिणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून य तरुणाने तिच्यावरही अत्याचार केले. आरोपी गेल्या सात दिवसांपासून फरार आहे. दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी त्याला शोधून त्याच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. त्याचबरोबर संबंधित आरोपीचे घर अनधिकृत असून ते तोडल्याशिवाय स्वस्त बसणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. गुजरातप्रमाणे आंतरधर्मीय किंवा आंतरजातीय विवाहंबाबत कुटुंबीयांना माहिती देण्याची तरतूद असलेला कायदा महाराष्ट्रात लागू करण्याची मागणी त्यांनी केली

फूस लावून मुली पाठवल्या लंडनला
पालघर जिल्ह्यातील अनेक मुलींना फूस लावून लंडनला नेण्यात आल्याचा गंभीर आरोप त्यांनी या वेळी केला. या संदर्भात सविस्तर माहिती राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देणार असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, आरोपीचा शोध घेण्यासाठी डहाणू पोलिसांची दोन पथके परराज्यात रवाना झाल्याची माहिती या वेळी पोलिसांनी दिली. आ. चित्रा वाघ यांच्यासोबत भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष भरत राजपूत व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते. त्यांनी डहाणूतील या गंभीर प्रकाराची माहिती आमदार वाघ यांना दिली. आ. वाघ आणि राजपूत यांनी दोन सख्ख्या बहिणीवर झालेल्या अत्याचारग्रस्त कुटुंबीयांची भेट घेतली. या कुटुंबाने सांगितलेली माहिती ऐकून ते निशब्द झाले. पोलिसांना या प्रकरणाचा तपास गांभीर्याने आणि कुटुंब जशी माहिती देईल, तसे पुरवणी आरोपपत्र जोडून करण्याचा सल्ला आ. वाघ यांनी दिला.

‘मुलींना पाण्यात काहीतरी मिसळून दिले जाते. ती मंतरलेली पावडर आहे, की गुंगी आणणारे औषध याचा तपास करण्याची आवश्यकता आहे. मुलींना गुंगी आल्यानंतर त्यांच्यावर अत्याचार केला जात असल्याची आणखी प्रकरणे उघडकीस येण्याची शक्यता आहे. त्यानुसार, पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चित्रा वाघ, आमदार, भाजपच्या महिला आघाडीच्या अध्यक्ष

banner 468x60

banner 468x60

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!