फिफा वर्ल्ड कपमध्ये गतविजेता अर्जंटिना आणि युरोपियन चॅम्पियन स्पेन यांच्यात आज मध्यरात्री वर्ल्डकपचा फायनलचा थरार पार पडणार आहे. या फायनल सामन्याकडे फुटबॉल चाहत्यांचे आणि जगभरातील चाहत्यांचे लक्ष लागले आहे.या फायनलसाठी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा निर्णय घेतला आहे.या निर्णयामुळे संपूर्ण महाराष्ट्र आज रात्रभर जागणार आहे आणि जल्लोष करणार आहे.
त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नेमकी काय घोषणा केली आहे? हे जाणून घेऊयात.
फिफा वर्ल्ड कप फायनलच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. मुंबई आणि महाराष्ट्रातील रेस्टॉरंट आणि कॅफे उद्या पहाटे 4.00 वाजेपर्यंत खुली ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.त्यामुळे आता फुटबॉल प्रेमींना आज रात्री मुंबई आणि महाराष्ट्रातील रेस्टॉरंट आणि कॅफेमध्ये बसून फायनलचा थरार पाहायची संधी मिळणार आहे.
फिफामध्ये आज अर्जेंटिना आणि स्पेन यांच्यात फायनल पार पडणार आहे. हा सामना रात्री 12.30 वाजता सुरू होणार आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने ही सवलत दिली आहे. या सवलतीने फुटबॉल प्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
फिफा फुटबॉल वर्ल्ड कप फायनलच्या पार्श्वभूमीवर रेस्टॉरंट असोसिएशनच्या मागणीची दखल घेत युवा नेते जय अजितदादा पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला. त्यानंतर फुटबॉलप्रेमी आणि हॉटेल व्यावसायिकांची सोय लक्षात घेऊन अंतिम सामन्यादिवशी पहाटे 4 वाजेपर्यंत खाद्यगृहे व कॅफे सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे.
गृह विभागाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करून ही परवानगी लागू राहणार असून, या सकारात्मक निर्णयाबद्दल जय पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत.
मुख्यमंत्र्यांनी परवानगीसह अटीही घातल्या
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हॉटेल, रेस्टॉरंट आणि कॅफे पहाटे 4 वाजेपर्यंत सुरु ठेवण्याची परनवागी दिली आहे. या परवानगीसह त्यांनी या सगळ्या आस्थापनांना काही अटीही घातल्या आहेत. या अटी काय आहेत? हे जाणून घेऊयात.
१. आस्थापनाधारकाने आस्थापनेच्या आतील व बाहेरील बाजूस मुबलक प्रमाणामध्ये खाजगी सुरक्षा रक्षक तैनात करुन, सदर जागी कोणताही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी.
२. आस्थापनेच्या आतील बाजूस अथवा बाहेर कोणताही अनुचित प्रकार/गुन्हा घडल्यास व त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास, त्याची संपूर्ण जबाबदारी आस्थापनाधारकावर राहील.
त्याप्रमाणे आस्थापनाधारक / परवानाधारक हे कारवाईस पात्र राहतील.
३. वेळेच्या संदर्भामधील शिथिलता ही जागेच्या परवान्याकरीता देण्यात येत आहे. परंतु ध्वनीक्षेपण कायदा व नियमांचे पालन करणे आस्थापनाधारकास बंधनकारक राहील. तसेच, याबाबत मा.
सर्वोच्च/उच्च न्यायालयाने यासंदर्भात वेळोवेळी दिलेल्या निर्देशानुसार ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक यंत्रणेचा वापर करावा.
४. वरीलप्रमाणे वाढीव वेळेची परवानगी, फक्त बंदिस्त जागेतील/इमारतीमधील आस्थापनांनाच देण्यात येत आहे.
५. सार्वजनिक शांतता तसेच, कायदा व सुव्यवस्था यांचा विचार करुन, योग्य वाटल्यास आवश्यकतेनुसार वरीलप्रमाणे वेळेच्या बंधनामधील शिथिलता नाकारण्याचे अधिकार स्थानिक पोलीस प्रशासनास राहतील.तसेच, सर्वत्र अत्यंत चोख बंदोबस्त ठेवण्याबाबत सर्व संबधितांना सुचना देण्यात याव्यात.


















zzlWzi8qqy8Un4Ec/s320/1001506655.jpg